भवरलाल जैन स्मृतिदिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, फेब्रुवारी २५, २०२३ रोजीचे

पंचांग आणि दिनविशेष

युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन ६, शके १९४४
सूर्योदय : ०७:०१ सूर्यास्त : १८:४२
चंद्रोदय : १०:३२ चंद्रास्त : २३:४७
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : षष्ठी – ००:२०, फेब्रुवारी २६ पर्यंत
नक्षत्र : भरणी – ०३:५९, फेब्रुवारी २६ पर्यंत
योग : ब्रह्म – १७:१८ पर्यंत
करण : कौलव – १२:१९ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ००:२०, फेब्रुवारी २६ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : मेष
राहुकाल : ०९:५६ ते ११:२४
गुलिक काल : ०७:०१ ते ०८:२९
यमगण्ड : १४:१९ ते १५:४७
अभिजित मुहूर्त : १२:२८ ते १३:१५
दुर्मुहूर्त : ०७:०१ ते ०७:४८
दुर्मुहूर्त : ०७:४८ ते ०८:३४
अमृत काल : २३:०४ ते ००:४३, फेब्रुवारी २६
वर्ज्य : १३:१५ ते १४:५४

उद्योगपती आणि समाजसेवक भवरलाल जैन-

जळगावपासून ५० कि.मी. अंतरावर असलेल्या वाकोद या छोट्याशा गावात भंवरलाल जैन यांचा १९३७ साली जन्म झाला. त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण आर. आर. हायस्कूलमध्ये तर बी. कॉम, एलएल.बी. मुंबई विद्यापीठातून केले. महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती जेव्हा मुंबई-पुण्यापलिकडे जात नव्हती, तेव्हा भवरलाल जैन यांनी स्वत:च्या औद्योगिक साम्राज्याचा पाया जळगावात रचला. शेती, शेतकरी आणि शेती संबंधित उद्योगात त्यांनी आपली बांधिलकी मानत पाश्चिमात्य देशांतले तंत्रज्ञान डोळसपणाने भारतीय मुशीत घालून ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले.

स्वत: शेतकरी असल्याने आणि पिढ्यान् पिढ्या शेती करणाऱ्या घरात जन्म घेतल्याने त्या व्यवसायाशी त्यांची नाळ उत्तमरित्या जुळली होती. त्यांनी प्रथम शेतीमध्ये लागणाऱ्या म्हणजे खते, बी-बियाणे, जंतुनाशके, ट्रॅक्टर्स यांच्या जोडीला रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस यांचा व्यापार केला. कच्च्या पपईमधील चिकातून काढलेल्या पेपेन या एन्झाइमची निर्यात करून उद्योजक-कारखानदार म्हणून पदार्पण केले.

पीव्हीसी पाइप्स, ठिबक सिंचन, एचडीपीई पाइप्स, पीव्हीसी शीटस् अशा उत्पादनांच्या साहाय्याने त्यांच्या उद्योगाचा विस्तार झाला, निर्यातही वाढत गेली. उती संवर्धनाने केळी पिकाला नवसंजीवनी मिळाली, तर सौरबंब आणि जैन ज्योत या उत्पादनांनी सौरऊर्जेवरील उत्पादनांमध्ये नवे दालन उघडले. कांदा निर्जलीकरणाची अन्नप्रक्रिया करून त्यांच्या गराची, सरांची, अर्काची निर्यात वाढवली. या एकूणच कामाचा सन्मान करत जैन इरिगेशनला फॉर्च्युनचा सन्मान नुकताच प्राप्त झाला होता. जगभरातील निवडक ५१ कंपन्यांच्या मानांकनात कंपनीचा ७ वा क्रमांक होता.

जैन यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे ‘ती व मी’ हे पत्नीवर लिहिलेले पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरले. निसर्गकवी ना. धों. महानोर हे त्यांचे बांधभाऊ होते. राजकीय क्षेत्रात अनेकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते किंबहुना सर्वच राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांशी त्यांची मैत्री होती. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आधुनिक आश्रमशाळा वाटावी आणि शिक्षणाबरोबरच संस्कार घडावे या हेतूने अनुभूतीसारखी इंग्रजी माध्यमाची शाळा काढून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
• २०१६: भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक भवरलाल जैन यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९३७)

घटना :
१५१०: पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.
१८१८: ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.
१९३५: फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
१९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.
१९४५: दुसरे महायुद्ध – तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९८६: जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.
१९९६: स्वर्गदारातील तार्याला (STAR IN THE GATE OF HEAVENS) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.

• मृत्यू :
• १९२४: जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले.
• १९६४: चित्रपट अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन.
• १९७८: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचे निधन. (जन्म: २९ जून १८९१)
• १९८०: लेखिका व नाटककार गिरजाबाई महादेव केळकर यांचे निधन.
• २०१९ :श्रीदत्तसंप्रदायातील थोर अधिकारी विभूतिमत्व व अक्षरश: जगभर परमार्थाचा प्रचार प्रसार करणाऱ्या व जवळपास 50 हजारहून जास्त परदेशी साधकांना दीक्षा देऊन परमार्थपथावर अग्रेसर करणाऱ्या केमिस्ट्रीच्या प्राध्यापिका प.पू. सौ. शकुंतलाताई आगटे या प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांच्या अत्यंत प्रसिद्धिपराङ्मुख उत्तराधिकारी यांचे देह त्याग. (हि तारीख व वेळ त्यांनी दोन वर्षे आधी सांगून ठेवली होती ) त्यांची संतवाङ्मयावर 23-24 पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. ( जन्म : २० मे, १९४७ )

जन्म :
१८४०: बालवाङ्मयकार विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९१४)
१८९४: आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६९ – मेहराझाद, पिंपळगाव, अहमदनगर, महाराष्ट्र)
१९३८: भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच फारूक इंजिनिअर यांचा जन्म.
१९४८: चित्रपट अभिनेते डॅनी डेंग्झोप्पा यांचा जन्म.
१९७४: हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९९३)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »