‘जयहिंद शुगर’चा एकरी शंभर टन ऊस उत्पादन प्रकल्प

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरने ‘सुवर्ण कृषी एकरी शंभर टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान’ प्रकल्पाला सुरुवात केली आहे.

जयहिंद शुगरकडून या नवीन तंत्रज्ञानाच्या प्रकल्पाची सुरुवात जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने-देशमुख, मुख्य कार्यकारी संचालक बब्रुवान माने-देशमुख, शालिवाहन माने-देशमुख, तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा. डॉ. अमोल पाटील, सुवर्ण कृषी ऊस तंत्रज्ञान’चे व्यवस्थापक नानासाहेब कदम यांच्या उपस्थितीत नुकतीच करण्यात आली.

जयहिंद शुगरमार्फत पाच हजार एकरवर फेब्रुवारी व मार्च महिन्यात ऊस रोप लागवड करून शेतकऱ्यांना वर्षभर बांधावर जाऊन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती जयहिंद शुगरचे मुख्य कार्यकारी संचालक बब्रुवान माने-देशमुख यांनी दिली.

कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस रोपे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नव्याने ऊस लागण करू इच्छिणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपली नावे जयहिंद शुगर कारखाना शेती विभागाकडे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘सुवर्ण कृषी एकरी शंभर टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान’ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी फायदेशीर ठरणारे आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »