ऊस दर : बिकेयूचे मुख्यमंत्री खट्टर यांना पत्र

सोनीपत : उसाच्या राज्य समर्थन मूल्याची (SAP) घोषणेस उशीर होत असल्याने नाराज झालेल्या भारतीय किसान युनियनने (चारुनी गट) मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पत्र लिहून SAP ची घोषणा करण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चारुनी यांनी खट्टर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात बहुतांश साखर कारखान्यांचा गळीत हंगाम २०२२-२३ सुरू झाला आहे. मात्र, सरकारने अद्याप दर निश्चिती केलेली नाही. साखर कारखाने सुरू होण्यापूर्वी ऊस पिकाची किंमत निश्चित करण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
ऊसाचा SAP गेल्या वर्षीच्या ३80 रुपयांच्या तुलनेत ४५० रुपये प्रती क्विंटल निश्चित करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
चारूनी यांनी पंजाब सरकारकडून २० रुपये प्रती क्विंटल दरवाढ दिल्याचा उल्लेखही पत्रामध्ये केला आहे. त्यामुळे तेथील SAP ३८० रुपये प्रती क्विंटल निश्चित झाला आहे.
ते म्हणाले की, आपल्याकडील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी SAP वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कारण, शेतकऱ्यांना पिकाला कीड, रोगांपासून वाचविण्यासाठी किटकनाशके तसेच खतांसह अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.”