सी हेवी मोलॅसिसच्या इथेनॉल दरात सात रुपये वाढ
पुणे : केंद्र सरकारने सी हेवी मोलॅसिसपासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या दरात ६ रुपये ८७ पैशाची, म्हणजेच सुमारे सात रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे इथेनॉलची किंमत प्रतिलिटर ४९ रुपये ४१ पैसेवरून ५६ रुपये २८ पैसे होणार आहे.
ज्यूस/सिरसपासूनच्या इथेनॉलवर निर्बंध लादल्याने निर्माण झालेल्या नाराजीला काही अंशी दूर करण्याचा केंद्र सरकारचा हा प्रयत्न आहे.
देशात इथेनॉल उत्पादन क्षमता सुमारे १३८० कोटी लिटर आहे. यातील ८० टक्के इथेनॉल साखर क्षेत्रातून येते. त्यात ज्यूस / सिरप आणि दोन्ही प्रकारच्या मळीपासून बनणाऱ्या इथेनॉलचा समावेश आहे. यामध्ये ज्यूस / सिरपपासून थेट इथेनॉल बनवण्याची परवानगी २०१८ नंतर देण्यात आली आणि २०२३ मध्ये मागे घेण्यात आल्याने साखर उद्योगाचे आर्थिक गणित अडचणीत आले आहे. त्यावर जुजबी उपाययोजन करण्यात येत आहेत.