सी. रामचंद्र

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, जानेवारी ५, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष १५ , शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०७:१३ सूर्यास्त : १८:१५
चंद्रोदय : ११:१६ चंद्रास्त : २३:३४
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : पौष
चंद्र माह : पौष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : षष्ठी – २०:१५ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा – २०:१८ पर्यंत
योग : व्यतीपात – ०७:३२ पर्यंत
क्षय योग : वरीयान् – ०४:५१, जानेवारी ०६ पर्यंत
करण : कौलव – ०९:०८ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – २०:१५ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : कुंभ – १४:३५ पर्यंत
राहुकाल : १६:५२ ते १८:१५
गुलिक काल : १५:२९ ते १६:५२
यमगण्ड : १२:४४ ते १४:०७
अभिजितमुहूर्त : १२:२२ ते १३:०६
दुर्मुहूर्त : १६:४७ ते १७:३१
अमृत काल : १२:३९ ते १४:११
वर्ज्य : ०५:२५, जानेवारी ०६ ते ०६:५६, जानेवारी ०६

१६६६ : शिखांचे दहावे गुरु – गुरु गोविंद सिंग यांचा जन्म – तिथीनुसार ( मृत्यू : ७ ऑक्टोबर, १७०८ )

कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे – कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र अशा विविध वाङ्मयप्रकारांत लेखन केलेल्या पेंडसेंची मराठी साहित्यात ओळख आहे ती कादंबरीकार म्हणूनच श्री.ना.पेंडसे यांची ‘जीवनकला’ ही पहिली कथा १९३८ मधे प्रसिद्ध झाली. नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. ‘खडकावरील हिरवळ’ हे त्यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक १९४१ साली प्रकाशित झाले. हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले आणि शेवटचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक. ‘जुम्मन’ (१९६६) हा एकमेव कथासंग्रह सोडला तर त्यांनी नंतर कथालेखनही केले नाही.

आपल्या अनुभवांचे रंगरूपही त्यांनी बारकाईने न्याहाळून आणि समजावून घेतले होते. विशिष्ट प्रदेशात आणि वातावरणात माणसांची मने आणि जीवने कसकसे रंग धारण करतात, ह्यासंबंधीच्या शोधातून आणि आकलनातून जन्माला आल्यामुळे पेंडशांच्या कादंबरीला मोठे बळ लाभलेले आहे. तथापि कल्पनारम्यता आणि स्वप्नरंजन ह्यांचा मोह त्यांनाही पूर्णत: टाळता आलेला नाही, अशी टीकाही त्यांच्या कादंबऱ्यांवर झालेली आहे. त्यांनी नाट्यलेखनही केलेले आहे. राजे मास्तर (१९६४), यशोदा (१९६५), गारंबीचा बापू (१९६५), असं झालं आणि उजाडलं (१९६९) ही त्यांची नाटके त्यांच्या अनुक्रमे हद्दपार,यशोदा, गारंबीचा बापू आणि लव्हाळी ह्या कादंबऱ्यांची नाट्यरूपे असून महापूर (१९६१), संमूसांच्या चाळीत (१९६७), चक्रव्यूह (१९७०) अशी काही स्वतंत्र नाटकेही त्यांनी लिहिली आहेत. जुम्मन (१९६६) हा त्यांचा कथासंग्रह आहे.

रथचक्र, लव्हाळी आणि ऑक्टोपस ह्या तीन कादंबऱ्या, पेंडशांच्या कादंबरीने घेतलेल्या वेगळ्या वळणाच्या द्योतक आहेत. साधू बनून परागंदा झालेल्या नवऱ्याचा संसार सांभाळणाऱ्या एका सामान्य स्त्रीचे भावजीवन आणि तिचा जीवनसंघर्ष रथचक्रात प्रत्ययकारीपणे साकारलेला आहे. ह्या कादंबरीला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले (१९६४). लव्हाळी ही कादंबरी एका सामान्य कारकुनाच्या रोजनिशीच्या स्वरूपात अवतरलेली आहे. जागतिक महायुद्धासारखी महान घटना घडत असताना त्याच्या जीवनात कोणत्या घडामोडी होत होत्या व त्या महान घटनेने त्याच्या जीवनाला कितपत स्पर्श केला, ह्याचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ऑक्टोपस ह्या कादंबरीत, संवाद व पत्रे ह्यांच्या साहाय्याने पूर्ण आशय पेलण्याचा प्रयोग त्यांनी करून पहिला आहे.

‘एक होती आजी’ (१९९५), ‘कामेरू’ (१९९७), ‘घागर रिकामी रे’, ‘रंगमाळी’ (२००२) आणि लोकमान्यांच्या जीवनावरील ‘हाक आभाळाची’ (२००७) या पेंडसेंनी आपल्या उत्तरायुष्यात लिहिलेल्या कादंबऱ्या होत. कादंबरीलेखनासोबतच पेंडसेंनी नाटय़लेखनही भरपूर केले आहे. त्यांनी आपल्या हयातीत अकरा नाटके लिहिली. त्यातील ‘राजेमास्तर’, ‘यशोदा’, ‘गारंबीचा बापू’, ‘असं झालं आणि उजाडलं’ आणि ‘रथचक्र’ ही नाटके त्यांच्याच कादंबऱ्यांवर आधारित होती. याशिवाय ‘महापूर’, ‘संभूसाच्या चाळीत’,‘चक्रव्यूह’, ‘शोनार बांगला’, ‘पंडित! आता तरी शहाणे व्हा’, ‘डॉ. हुद्दार’ ही वेगळ्या पिढीतली नाटके.

त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, जनस्थान पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

१९१३: मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च , २००७)

प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक व पार्श्वगायक सी. रामचंद्र – मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. – चित्रपटात काम करण्याचीही सी. रामचंद्र यांना ओढ होती. नागानंद ह्या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले; परंतु तो चित्रपट यशस्वी झाला नाही. प्रसिद्ध चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक सोहराब मोदी ह्यांच्या ‘मिनर्व्हा मूव्हिटोन’ ह्या संस्थेच्या संगीत विभागात हार्मोनियमवादनाचे काम त्यांना मिळाले आणि संगीतदिग्दर्शनाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली.

हिंदी स्टंटपटांतून काम करणारे अभिनेते भगवान पालव ऊर्फ मा. भगवान ह्यांच्याशी झालेल्या मैत्रीमुळे त्यांना जयक्कोडी हा तमिळ चित्रपट संगीतदिग्दर्शनासाठी मिळाला. त्यांचे संगीत असलेला हा पहिला चित्रपट. त्यानंतर वनमोहिनी हा आणखी एक तमिळ चित्रपट त्यांना मिळाला. मा. भगवान यांच्या सुखी जीवन ह्या चित्रपटातील ‘सारे जहाँसे अच्छा’ ह्या गीतामुळे संगीतकारांच्या जगात त्यांच्या नावाचा बोलबाला झाला. ‘जयंत देसाई प्रॉडक्शन्स’ चे जबान, मनोरमा, ललकार, चंद्रगुप्त असे काही चित्रपटही त्यांनी केले.

पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कवी प्रदीप ह्यांच्यामुळे शशीधर मुखर्जी ह्यांच्या ‘फिल्मिस्तान’ ह्या चित्रपटसंस्थेत सी. रामचंद्रांचा प्रवेश झाला. या चित्रपटसंस्थेच्या शहनाई ह्या चित्रपटाला त्यांनी दिलेले संगीत-विशेषतः त्यातील ‘आना मेरी जान संडे के संडे’ हे गाणे अत्यंत लोकप्रिय झाले. ह्या चित्रपटामुळे त्यांचे नाव भारतभर झाले. अनेक चित्रपट संगीतदिग्दर्शनासाठी त्यांच्याकडे आले. मा. भगवान ह्यांच्या अलबेला ह्या लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले.

त्यातील ‘भोली सूरत दिलके खोटे’, ‘शोला जो भडके’ , ‘शाम ढले खिडकी तले’, ‘मेरे पिया गये रंगून’ ही गाणी अतिशय गाजली. त्यांना रसिकांनी खूप प्रतिसाद दिला. विशेषत: ‘धीरे से आजा रे अखियनमे निंदिया’ हे अंगाई गीत हिंदी चित्रपटांतल्या गाजलेल्या अविस्मरणीय अंगाई गीतांपैकी एक मानले जाते. त्यानंतर फिल्मिस्तानच्या अनारकलीने यशाचा उच्चांक गाठला. या यशात सी. रामचंद्रांच्या संगीताचा वाटा खूप होता. ‘ये जिंदगी उसीकी है’ हे त्यातले लता मंगेशकर यांनी गायलेले गीत अवीट गोडीमुळे अजरामर ठरले.

आझाद, इन्सानियत, तिरंदाज, यास्मिन, शहनाई, नवरंग, नास्तिक, झांझर, शिनशिनाकी बबला बू, दुनिया गोल है हे त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखालील काही उल्लेखनीय चित्रपट होत. त्यांपैकी झांझर व दुनिया गोल है यांची निर्मिती त्यांनी १९५५ मध्ये अभिनेते ओमप्रकाश यांच्याबरोबर ‘न्यू साई प्रॉडक्शन्स’ तर्फे केलेली होती. तिरंदाज व यास्मिन या चित्रपटांच्या संगीतात त्यांनी अरबी संगीताचा कौशल्यपूर्ण वापर केला होता. पाश्चात्त्य संगीताचा बाज, सुरावट व वाद्यवृंद हिंदी सिनेसंगीतात आणण्याचे व लोकप्रिय करण्याचे श्रेय मुख्यत्वे सी. रामचंद्र यांच्याकडे जाते. त्याच वेळी भारतीय संगीतातील गोडवा व सुरावटही त्यांनी आपल्या संगीतातून जपली.

सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली काही हिंदी चित्रपटगीते उत्कृष्ट व अविस्मरणीय ठरली. उदा. ‘जाग दर्दे इश्क जाग’ , ‘जिंदगी प्यार की दो चार घडी होती है’ (अनारकली ), ‘आधा है चंद्रमा रात आधी’ (नवरंग ), ‘देख तेरे संसार की हालत’ ( नास्तिक ), ‘ कैसे आऊँ जमुना के तीर’ (देवता ), ‘कितना हसीन है मौसम’ (आझाद ), ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ (समाधी ), ‘इना मिना डिका’ (आशा ), ‘कटते है दुख मे ये दिन’ (परछाई या चित्रपटातील लता मंगेशकरांनी गायिलेली ठुमरी) व ‘तुम क्या जानो, तुम्हारी याद मे’ (शिनशिनाकी बबला बू मधील लता मंगेशकरांची ठुमरी), ‘आँखो मे समा जाओ, इस दिलमें रहा करना’ (यास्मिन ), ‘जलनेवाले जला करे’ (खिडकी ) इत्यादी.
सी. रामचंद्र यांनी हिंदीबरोबरच काही मराठी, तमिळ, तेलुगू व भोजपुरी चित्रपटांनाही संगीत दिले.

सुरुवातीच्या काळात आर्. एन्. चितळकर या नावाने त्यांनी काही मराठी चित्रपटांत भूमिका केल्या व गाणीही गायिली. १९६० च्या दशकात त्यांनी धनंजय व घरकुल या मराठी चित्रपटांना संगीत दिले व त्यांत प्रमुख भूमिकाही केल्या. घरकुल चित्रपटाची निर्मिती सी. रामचंद्रांनी केली होती.

घरकुलमधील गाणी, विशेषत: ‘पप्पा सांगा कुणाचे’ व ‘मलमली तारुण्य माझे’ ही गाणी, लोकप्रिय झाली. जुन्या होतकरू कलाकारांना एकत्र आणून सी. रामचंद्रांनीच स्वरसाज चढवलेल्या सदाबहार गीतरचनांवर आधारित ‘भूलाये ना बने’ ह्या विलोभनीय कार्यक्रमाची निर्मिती त्यांनी केली.


भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू ह्यांच्या उपस्थितीत सी. रामचंद्र यांनी लता मंगेशकर ह्यांच्या आवाजात दिल्ली येथे २७ जानेवारी १९६३ रोजी सादर केलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ ह्या गीताला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. कवी प्रदीपजींनी भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या ह्या भावोत्कट गीतात देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण ठेवण्याचे आवाहन सर्व भारतीयांना केलेले आहे. हृदयस्पर्शी व प्रेरणादायी असे हे गीत आजही पूर्वीइतकेच लोकप्रिय आणि आवाहक आहे. सी. रामचंद्रांनी माझ्या जीवनाची सरगम हे आपले आत्मचरित्र लिहिले आहे.

• १९८२: भारतीय संगीतकार रामचंद्र चितळकर उर्फ सी. रामचंद्र यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी, १९१८)

  • घटना :

१६६४: छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला निरोप पाठविला.
१६७१: छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले.
१८३२: दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.
१९१९: द जर्मन वर्कर्स पार्टीची स्थापना. या पार्टीचे पुढे नाझी पार्टीत रुपांतर झाले.
१९२४: महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी खुले केले.
१९३३: सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.
१९४८: वॉर्नर ब्रदर्स यांनी रोझ बाऊल फुटबॉल स्पर्धेच्या जगातील पहिल्या रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.
१९४९: पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.
१९५७: विक्रीकर कायदा सुरू झाला.
१९७४: अंटार्क्टिकामधील सर्वोच्च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद झाली.
१९९७: रशियाने चेचेन्यातुन सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.
१९९८: ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२००४: भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे हल्ल्यात अतोनात नुकसान.

  • मृत्यू :
    • १९७१: भारतीय जादुगार पी. सी. सरकार यांचे निधन. (जन्म:२३ फेब्रुवारी , १९१३)
    • १९९०: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक रमेश बहल यांचे निधन.
    • १९९२: इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै, १९१४)
    • २००३: पखवाजवादक गोपालदास पानसे यांचे निधन.
  • जन्म :
    १८६८: मराठी संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू यांचा जन्म.
    १८६९: कन्नड साहित्यिक व्यंकटेश तिरको कुलकर्णी यांचा जन्म.
    १८९२: लेखक व मराठी भाषातज्ञ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून, १९६४ )
    १९२२: आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते मोहम्मद उमर मुक्री यांचा जन्म. (मृत्यू: ४ सप्टेंबर, २०००)
    १९४१: भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर, २०११)
    १९४८: अभिनेत्री आणि गायिका फय्याज यांचा जन्म.
    १९५५: पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »