ऊस दर : कृषी मूल्य आयोगाची पुण्यात बैठक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : ऊस दराबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची महत्त्वाची बैठक पुण्यात साखर संकुल येथे २० ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हंगाम २०२३-२४ साठी सरकारने एफआरपी जाहीर केली आहे, त्यापुढील हंगामासाठी किती वाढीव एफआरपी असावी, याबाबत बैठकीत चर्चा होईल.

आयोगाचे अध्यक्ष प्रा.विजय पॉल शर्मा, सदस्य डॉ. नवीन प्रकाश सिंग, अनुपम मिश्रा यावेळी उपस्थित राहणार आहेत. साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह सर्व साखर संचालक, उपसंचालक, सहसंचालक, क्षेत्रीय सहसंचालक बैठकीस उपस्थित असतील.

राज्यातील १३ साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, २६ ऊस उत्पादक शेतकरी, ‘विस्मा’चे प्रतिनिधी, कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी, कृषितज्ज्ञ, राज्य साखर संघाचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आदींना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आल्याचे सूत्रांची सांगितले. ऊस पिकावरील लागत खर्च किती वाढला आहे, प्रस्तावित अंतिम दर किती असावा आदी मुद्यांवर सविस्तर कृषी मूल्य आयोगा उपस्थितांशी सविस्तर चर्चा करेल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »