सहकारी संस्थांच्या निवडणुकाना मुहूर्त लागणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल डिसेंबरनंतर म्हणजे पुढील वर्षातच वाजणार आहे. निवडणुका लांबणीवर पडल्याने राज्यातील सुमारे ४० ते ४५ हजारांहून अधिक सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांना मुदतवाढ मिळालेली आहे.

यापूर्वी म्हणजे २०१८-१९ मध्ये कोरोनामुळे सहकारातील संस्थांच्या निवडणुका सुमारे दोन ते अडीच वर्षे लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे अनेक संस्थांतील संचालकांना सुमारे ३ वर्षांपर्यंत मुदतवाढ मिळाली होती.
सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आणि पावसाळी वातावरणामुळेही निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. पाठोपाठ नुकत्याच संपलेल्या १५ व्या विधानसभा निवडणुकांमुळे ३१ डिसेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. परंतु, निकालानंतर आचारसंहिता शिथिल केल्यामुळे लवकरच सहकारी संस्थांच्या निवडणुकींचे बिगुल वाजणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »