‘नॅचरल शुगर’ चा सीबीजी पंप लोकसेवेत रुजू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

संस्थापक बी.बी. ठोंबरे यांच्या हस्ते लोकार्पण

धारशिव – आज नॅचरल शुगरने स्वतःचा बायो सीएनजी (सीबीजी) पंप उभा करून, तो जनतेच्या सुविधेसाठी कारखाना स्थळावर लोकार्पण केला . सीएनजीचा हा पंप २४ तास सुरू राहणारा एकमेव पंप आहे, असे अभिमानास्पद उद्गार नॅचरल उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी काढले.

नॅचरल शुगर मध्ये नवनवीन प्रकल्प उभारणीचा सपाटा सुरू असून २०२२ मध्ये नॅचरल शुगरने बायो सीएनजी प्रकल्पाची उभारणी भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हाती घेवून पूर्ण करून प्रत्यक्ष उत्पादनास सुरूवात केली. बायो सीएनजीची विक्रीही लातूर शहरा मध्ये सुरू आहे. आता स्वतःचा पंप सुरू केला आहे.

उद्घाटन सोहळ्यात ठोंबरे म्हणाले की, २०२२ मध्ये कोरोना या महामारीने थैमान घातले असतानाही त्यावर मात करून भविष्यातील भारताच्या प्रदुषनमुक्त इंधनाची गरज लक्षात घेवून आणि साखर कारखान्यामध्ये उत्पादीत टाकावू पदार्था पासून इंधन निर्मिती करण्याचा संकल्प हाती घेवून सीएनजी प्रकल्पाची उभारणी पूर्ण करून ‘नॅचरल बायो सीएनजी’ ग्राहकांना उपलब्ध करून दिला. नॅचरल सीएनजी प्रकल्पा मुळे उत्पादीत होणा-या पर्यावरण पूरक इंधनामुळे देशाचे परकीय चलनही कांही प्रमाणात वाचेल आणि वाहनांच्या वापरा मुळे होणा-या प्रदुषणासही आळा बसण्यास मदत होईल.

नॅचरल शुगर कारखाना साईटवर बायो सीएनजी ग्राहकांना उपलब्ध व्हावा यादृष्टीने नवीन बायो सीएनजी पंपाचे भूमीपूजन दीड वर्षा पूर्वी केले होते; परंतु शासकीय सर्व मान्यता घेण्यास खुप मोठा वेळ वाया गेला. सर्व शासकीय मान्यता घेवून आज सर्व जनतेच्या सेवेत नॅचरल शुगरने सीएनजी पंप सुरू केला असून त्याचा कमीत कमी दर रू.८०/ ठेवण्यात आला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »