ऊस तोडणी महिला कामगारांचे आरोग्यविषयक सर्वेक्षण करा
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना
जालना : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जालना जिल्ह्यातील प्रशासनातील संबंधित विभाग प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या आढावा बैठकीदरम्यान उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी अवकाळी पाऊस, महिला अत्याचार, पाणीटंचाई व ऊसतोड आणि घरकाम कामगार आदी विविध विषयांबाबतचा आढावा संबंधित विभाग प्रमुखांकडून घेऊन विविध विषयांवर यावर चर्चा करण्यात आली.
या आढावा बैठकीदरम्यान, जालना जिल्ह्यातील ऊस तोडणी महिला कामगारांच्या आरोग्य विषयक सर्वेक्षण करण्यात यावे, नोंदणी झालेल्या ऊसतोड कामगारांना नोंदणी कार्डचे वितरण त्वरित वितरण करण्यात यावे, तसेच राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील घरकाम करणाऱ्या कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती संकलित करण्यासह विविध सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या. येथील शासकीय विश्रागृहात शुक्रवारी ही बैठक आयोजित केली होती.