साखर कारखान्याच्या घोटाळ्याला कोर्टाचा धक्का; जामीन नाकारला

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सचिन घायाळ १६ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अडचणीत

पैठण : सचिन घायाळ शुगर लिमिटेडचे संचालक सचिन घायाळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडे तारण ठेवून ३० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. त्यापैकी १६ कोटी ६२ हजार रुपयांचा घोटाळा झाल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडित काकडे यांनी पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात महत्त्वाचे दस्तावेज तपासासाठी आवश्यक असल्याचे सांगत जामीन अर्ज फेटाळावा, अशी बाजू मांडली. त्यानुसार न्यायालयाने अर्ज नामंजूर केला.

दरम्यान, कामगार न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्यातील कामगारांचे थकीत ८६ लाख ४० हजार ४७३ रुपये पीएफ व वेतन वसुलीसाठी महसूल पथकाने कारखान्याचे दोन साखर गोडाऊन सील केले आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »