दादाभाई नौरोजी

आज सोमवार, जून ३०, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक ९, शके १९४७
सूर्योदय : ०६:०४ सूर्यास्त : १९:२०
चंद्रोदय : १०:३७ चंद्रास्त : २३:१९
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ़
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पञ्चमी – ०९:२३ पर्यंत
नक्षत्र : मघा – ०७:२० पर्यंत
योग : सिद्धि – १७:२१ पर्यंत
करण : बालव – ०९:२३ पर्यंत
द्वितीय करण : न कौलव – २१:४६ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : सिंह
राहुकाल : ०७:४४ ते ०९:२३
गुलिक काल : १४:२२ ते १६:०१
यमगण्ड : ११:०३ ते १२:४२
अभिजितमुहूर्त : १२:१६ ते १३:०९
दुर्मुहूर्त : १३:०९ ते १४:०२
दुर्मुहूर्त : १५:४८ ते १६:४१
अमृत काल : ०२:०५, जुलै ०१ ते ०३:४७, जुलै ०१
वर्ज्य : १५:५२ ते १७:३४
३० जून हा दिवस ‘जागतिक अशनी दिन’ म्हणून पाळला जातो. यामागे पृथ्वीला व पृथ्वीवरील सजीवांना धोकादायक ठरणाऱ्या अंतराळातील दगडधोंडे, खडक, अशनी, लघुग्रह, धूमकेतू यांबाबत सावध करण्याचा केवळ हेतू आहे.
आज आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन आहे.
पितामह दादाभाई नौरोजी शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक व भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते. जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाउस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे ते पहिले भारतीय. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी ॲन्ड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. ( भारताच्या लुटीच्या सिद्धान्ताचे जनक मानले जाते ). १८८३ साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला.
१८४५ – स्टुडंट्स लिटररी सायंटिफिक सोसायटी ही संस्था स्थापन करण्यात सहभा होता तसेच . १८८५ – भारतीय राष्ट्रीय कॉ्ंग्रेसचे संस्थापक सदस्यांपैकी एक होते. १८८६, १८९३व १९०६ – भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्षपद भूषविले.
• १९१७: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)
राव, चिंतामणी नागेश रामचंद्र : (३० जून १९३४ – ). भारतीय रसायनशास्त्रज्ञ. ⇨घन अवस्था रसायनशास्त्र, ⇨पृष्टविज्ञान, ⇨वर्णपटविज्ञान व ⇨रेणवीय संरचना या विषयांत त्यांनी विशेष संशोधन केलेले आहे.
राव यांचा जन्म बंगलोर येथे झाला. तेथील सेंट्रल कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी १९५१ मध्ये बी. एस्सी. पदवी मिळविली व त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठाची एम्. एस्सी. (१९५३) व अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठाची पीएच्.डी. (१९५७-५८) या पदव्या संपादन केल्या. प्रारंभी ते बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या रसायनशास्त्र विभागात अधिव्याख्याते होते (१९५९ –६३). त्यानंतर ते कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख झाले (१९६३ –७६). तेथे त्यांनी संस्थेच्या संशोधनात आणि विकास कार्याचे अधिष्ठाते म्हणूनही काम केले (१९६९ – ७२). इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये १९७६ साली ते परत आले आणि तेथे त्यांनी घन अवस्था व संरचना रसायनशास्त्र या विषयांकरिता एक नवीन शाखा तसेच सामग्री संशोधन प्रयोगशाळा प्रस्थापित केली. या शाखेचे व प्रयोगशाळेचे ते अध्यक्ष आहेत. पर्ड्यू (१९६७-६८ आणि १९८२), ऑक्सफर्ड (१९७४-७५), केंब्रिज (१९८३-८४) व लाट्रोब (मेलबर्न, ऑस्ट्रेलिया) या विद्यापीठांत त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केलेले आहे.
राव यांनी रासायनिक वर्णपटविज्ञान, रेणवीय संरचना, घन अवस्था रसायनशास्त्र व पृष्ठविज्ञान या आपल्या संशोधन विषयांत नवनवीन तंत्रे वापरली आहेत. मुक्त रेणूंच्या इलेक्ट्रॉन अवस्थांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी जंबुपार फोटोइलेक्ट्रॉन वर्णपटविज्ञानाचा [⟶ वर्णपटविज्ञान] उपयोग केला. घन अवस्था रसायनशास्त्रात त्यांनी प्रावस्था रूपांतरण [⟶ प्रावस्था नियम], दोषयुक्त घन पदार्थ, जटिल धातवीय ऑक्साइडांचे इलेक्ट्रॉनीय व चुंबकीय गुणधर्म आणि घन पदार्थांचे वर्णपटविज्ञान या शाखांत महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे. जटिल घन पदार्थांच्या गुणधर्मांचे रासायनिक बंधांच्या तत्त्वावर आधारलेले एकीकृत स्पष्टीकरण मांडण्यासाठी राव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेत विविध ऑक्साइडे व नावीन्यपूर्ण संरचनेची इतर द्रव्ये कृत्रिम रीत्या तयार करण्यात आली आहेत. क्ष-किरण व जंबुपार फोटोइलेक्ट्रॉन वर्णपटविज्ञान, ऑगर वर्णपटविज्ञान वगैरे आधुनिक तंत्रे उपयोगात आणणारी भारतातील पहिली पृष्ठविज्ञानीय प्रयोगशाळा त्यांनी विकसित केली. विविध आधुनिक प्रयोग पद्धती व सैद्धांतिक आगणन यांवर आधारलेला अनेकदिशीय दृष्टिकोन अंगिकारणे हे राव यांच्या संशोधनाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.
भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विज्ञान सल्लागार समितीचे सदस्य, भारत सरकारच्या पहिल्या विज्ञान व तंत्रविद्याविषयक राष्ट्रीय समितीचे सदस्य, इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे उपाध्यक्ष व सचिव, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान मंडळाचे सदस्य, सोसायटी ऑफ द कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे सदस्य, भारत सरकारच्या विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन परिषदेचे सदस्य, भारत सरकारच्या विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन परिषदेचे सदस्य, सोसायटी ऑफ द कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे सदस्य, करंट सायन्स ॲसोसिएशनचे अध्यक्ष, ब्युरो ऑफ द इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्रीचे (आययूपीएसी) सदस्य, इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिफिक युनियन्सच्या विज्ञान व तंत्रविद्या प्रदत्त समितीच्या कार्यकारी समितीचे सदस्य, आययूपीएसीच्या वर्णपटविज्ञान आणि रेणवीय संरचना आयोगाचे अध्यक्ष, आययूपीएसीच्या रसायनशास्त्र अध्यापन समितीचे अध्यक्ष, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्रीचे निर्वाचित अध्यक्ष, भारतीय विज्ञान परिषदेच्या रसायनशास्त्र विभागाचे अध्यक्ष भारताच्या अणुऊर्जा खात्याच्या रसायनशास्त्र व धातुविज्ञान संशोधन समितीचे अध्यक्ष वगैरे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलेले आहे. जानेवारी १९८८ मध्ये पुणे येथे भरलेल्या भारतीय विज्ञान परिषदेच्या पंचाहत्तराव्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.
राव यांनी आपल्या संशोधन विषयांसंबंधी १२ ग्रंथ व ३५० हून अधिक संशोधनात्मक निबंध लिहिलेले आहेत. रासायनिक भौतिकी, वर्णपटविज्ञान आणि घन अवस्था रसायनशास्त्र या विषयांवरील १२ आंतरराष्ट्रीय नियतकालिकांच्या संपादकीय मंडळांचे ते सदस्य आहेत.
१९३४: भारत रत्न पुरस्कार सन्मानित भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म.
‘घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात ।
सुखी आहे पोरं सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परि मन खंतावतं ।
विसरली का ग भादव्यात वर्स झालं
माहेरीच्या सुखाला गं मन आंचवलं ।
फिरून फिरून सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा गं शेव ओलाचिंब होतो ।
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगुनिया करी कशी गं बेजार ।
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फूल वेचायला नेशील तू गडें ।
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय ।
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला।’
- श्री कृ. ब.निकुंब
भावकवी आणि मृगावर्त या नाविन्यपूर्ण खंडकाव्य चे निर्माते श्री कृ. ब.निकुंब
“घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात ” असे हळुवारपणे लिहिणारे निकुंब जितके कवी म्हणून थोर होते तितकेच एक शिक्षक म्हणूनही फार मोठे होते. निकुंब हे लिंगराज कॉलेजमध्ये साहित्य परंपरा आणि संप्रदाय या विषयात शिकवायचे.
शिकवण्याच्या ओघात कितीतरी कवींच्या कविता सहज सहज म्हणायचे. प्रत्येक वर्गाला काहीतरी नवीन देण्याचा निकुंब यांचा नेहमीच प्रयत्न असायचा. त्यांच्या व्याख्यानातून विद्वत्तेचा फार मोठा विद्यार्थ्यांच्या काळजापर्यंत पोहोचायचा कितीतरी कविता तसेच ज्ञानेश्वरी सुद्धा सरांना पाठ होती, गर्व आणि अहंकार यापासून लांब करून विद्यार्थ्यात मिसळून श्री निकुंब सर विद्यार्थ्यांना समजावून द्यायचे. निकुंब यांची घाल घाल पिंगा वाऱ्या ही कविता तिच्या वेगळेपणामुळे रसाळ काव्य आशयामुळे उठून दिसत होती. थेट काळजाला हात घालणारे शब्द अन् भावविभोर झालेल्या सासु सुनेचे हृदय संगम प्रकटन जणू आपण अनुभवत आहोत असा भास या कवितेतून होतो. सुमन कल्याणपूरकर यांनी गायलेले हे गाणं रेडिओवर लागले की सर्व वयाच्या सासुरवाशीणी हमसून हमसून रडत असत. कवी निकुंब यांच्या कविता मोजक्याच मात्र आशय घन आहेत.मृगावर्त, पंखपल्लवी, उर्मिला, उज्वला, अनुबंधन हे त्यांचे लेखन होय.
१९९९: भावकवी कृ. ब. निकुम्ब यांचे निधन ( जन्म. २२ नोव्हेंबर, १९१९ )
- घटना :
१८५९: चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एकादोरीबारून कसरत करीत पार केला.
१९३७: जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला.
१९४४: मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रभातचा रामशास्त्री हा चित्रपट रिलीज झाला.
१९६०: काँगोला बेल्जियमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९६५: भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.
१९६६: अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन ची स्थापना झाली.
१९७१: सोयुझ-११या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.
१९७८: अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.
१९८६: केंद्रसरकार मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.
१९९७: ब्रिटनने चीन कडून ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.
• मृत्यू :
• १९९२: साहित्यिक, वक्ते समीक्षक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचे निधन. (जन्म: १९ डिसेंबर , १९२७)
• १९९४: नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर , १९२६)
• १९९७: शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक राजाभाऊ साठे यांचे निधन.
• १९९९: मराठी काव्यसृष्टीतील कवी कृष्णाबळवंत तथा कृ. ब. निकुंब यांचे निधन. ( जन्म: २२ नोव्हेंबर, १९१९ )
• २००७: दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे निधन. ( जन्म: १५ मार्च, १९४३)
- जन्म :
१९२८: पद्मश्री पुरस्कार सन्मानित कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट, २०००)
१९४३: दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा जन्म.
१९५९: भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी संदीप वर्मा यांचा जन्म.