एन.व्ही.पी. शुगर दीड लाख मे. टन ऊस गाळप करणार : पाटील

आवडल्यास ही बातमी शेअर करा

धाराशिव : एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि. (जागजी, जि. धाराशिव) कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाचा मिल रोलर पुजन कार्यक्रम कारखान्याचे मार्गदर्शक आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते पार पडला. या हंगामात पुर्ण क्षमतेने कारखाना चालवून १ लाख ५० हजार मे.टन गाळप करण्यात येईल, असे चेअरमन बालाजी उर्फ नानासाहेब पाटील यांनी यावेळी जाहीर केले.

गेल्या वर्षी प्रथम गळीत हंगाम घेण्यात आला होता, यामध्ये पूर्ण क्षमतेने १,०२,००० मे.टन गाळप करण्यात आले आहे. सदरील हंगामातील ऊस बिल, तोडणी-वाहतुक बिल रक्कम दिलेल्या शब्दाप्रमाणे सर्व अदा करण्यात आली आहे.

यावर्षी पाऊस काळ चांगला पडण्यास सुरू झाला असल्याने किंबहुना शेतकऱ्यांनी सुद्धा यंदा ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे, या हंगामात पुर्ण क्षमतेने कारखाना चालवून १ लाख ५० हजार मे.टन गाळप करण्यात येईल. तोडणी-वाहतुकीचे करार पुर्ण करुन ठेकेदारांना पहिला हप्ता देण्यात आला असुन गळीत हंगाम वेळेत सुरु करण्यात येणार आहे. रोलर पूजनामुळे कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण होऊन कामास गती प्राप्त होते. यंत्रसामग्री दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात असून, कारखाना निर्धारित वेळेत ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होणार आहे, असे पाटील म्हणाले.

याप्रसंगी कार्यकारी संचालक कृष्णा पाटील, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, चिफ इंजिनिअर ओंकार मोकाशे, चिफ केमिस्ट उमेश बिक्कड, इलेक्ट्रिक इंजिनिअर प्रवीण यादव, विजय वाघे, प्रविण पाटील, अजय गाडे, लेबर ऑफिसर दत्तात्रय गायकवाड, सुधाकर खोत, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »