आज दही हंडी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शनिवार, ऑगस्ट १६, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक २६, शके १९४७
सूर्योदय : ०६:२० सूर्यास्त: १९:०५
चंद्रोदय : ००:१३, ऑगस्ट १७ चंद्रास्त : १२:५९
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अष्टमी – २१:३४ पर्यंत
नक्षत्र : कृत्तिका – ०४:३८, ऑगस्ट १७ पर्यंत
योग : वृद्धि – ०७:२१ पर्यंत
क्षय योग: ध्रुव – ०४:२८, ऑगस्ट १७ पर्यंत
करण : बालव – १०:४१ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – २१:३४ पर्यंत
सूर्य राशि : कर्क – ०२:००, ऑगस्ट १७ पर्यंत
चंद्र राशि : मेष – ११:४३ पर्यंत
राहुकाल : ०९:३१ ते ११:०७
गुलिक काल : ०६:२० ते ०७:५५
यमगण्ड : १४:१८ ते १५:५४
अभिजित मुहूर्त : १२:१७ ते १३:०८
दुर्मुहूर्त : ०६:२० ते ०७:११
दुर्मुहूर्त : ०७:११ ते ०८:०२
अमृत काल : ०२:२३, ऑगस्ट १७ ते ०३:५३, ऑगस्ट १७
वर्ज्य : १७:२२ ते १८:५२

दही हंडी गोपाळ काला
गोविंदा आला रे आला
ज़रा मटकी सम्भाल बृजबाला
अरे एक दो तीन चार संग पाँच छः सात हैं ग्वाला ॥
गोविंदा आला रे…॥

श्रीकृष्णाला बालपणी दही, दुध, लोणी या पदार्थाची आवड होती. पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत असे तो त्याच्या मित्रांमुळे यासाठी त्याचे मित्र त्याला मदत करत असत. याघटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातेा.

आज दही हंडी / गोपाळ काला दिन आहे.

रामकृष्ण परमहंस – सर्व धर्मीयांसाठी त्यांचा “जतो मत, ततो पथ” (जितकी मते, तितके पंथ) हा उपदेश सहिष्णुतेचे प्रतीक आहे. परमहंसांचे खालील उद्गार प्रसिद्ध आहेत.

” माझा धर्म बरोबर, दुसऱ्यांचा धर्म चूक – हे मत योग्य नाही. ईश्वर एकच आहे, त्याला वेगवेगळे लोक भिन्न भिन्न नावाने पुकारतात. कोणी म्हणते गॉड, कोणी अल्ला, कोणी म्हणते कृष्ण, कोणी म्हणते शिव, कोणी म्हणते ब्रह्म. तळ्यात पाणी असते पण कोणी त्याला पाणी म्हणते, कोणी वॉटर तर कोणी जल. हिंदू त्याला जल म्हणतात, ख्रिश्चन वॉटर, मुसलमान म्हणतात पाणी, – पण वस्तू एकच असते. एक-एका धर्माचे एक-एक मत असते, एक-एक पथ असतो – परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी; जशी नदी नाना दिशांहून येऊन एकाच सागरात विलीन होते. “

१८८६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस यांनी समाधी घेतली. (जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ – कार्मापुकुर, हुगळी, पश्चिम बंगाल)

‘वसुधैव कुटुम्बकम’चा नारा देतानाच मानवाधिकाराबरोबरच वर्णभेदावरही मा. अटलजींनी भाष्य केलं होतं. ‘मैं भारत की ओर से इस महासभा को आश्वासन देना चाहता हूं कि हम एक विश्व के आदर्शों की प्राप्ति और मानव कल्याण तथा उसके गौरव के लिए त्याग और बलिदान की बेला में कभी पीछे नहीं रहेंगे.’ असं त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मंचावरून ठणकावून सांगितलं होतं. त्यांच्या या भाषणानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या चर्चेचा नूरच पालटला होता. – मा. अटलजींचे संयुक्त राष्ट्र संघात पहिल्यांदाच केलेले भाषण. ते सुद्धा राष्ट्र भाषा हिंदीतून

मा. अटलजींना भावपूर्ण श्रध्दांजली.

२०१८ : माजी पंतप्रधान ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी यांचं रोजी वृद्धापकाळानं निधन.

• १६ऑगस्ट, १९९१ : संघाचे आसाममधील प्रचारक श्री प्रमोद दीक्षित ( मूळचे पुणे शहरातील ) बरपेटा येथे जिल्हा प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती होती, पण दुर्दैवाने ती शेवटचीच ठरली. असंच कार्यमग्न असताना वयाच्या ४२व्या वर्षी बरपेट्याच्या ‘केशवधाम’ ह्या संघ कार्यालयात उल्फा अतिरेक्यांकडून हत्या करण्यात आली. देशकार्य, संघकार्य करीत असताना अशा प्रकारे मृत्यूला सामोरे जाणाऱ्या ह्या वीरास विनम्र अभिवादन. ( जन्म – ५ जून , १९४९ )

  • घटना :
    १९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.
    १९४६ कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.
    १९४६: सिकंदराबाद मध्ये सर्व हैदराबाद ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली.
    १९५४: स्पोर्ट्स इलस्ट्रॅटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
    १९६०: सायप्रसला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
    १९६२: आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच भारत प्रदेश भारताला देण्यात आले.
    १९९४: बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार जाहीर.
    २०१०: जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.

मृत्यू :
• १९६१: भारतीय भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८७०)
• १९९७: अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन.
•२०००: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९५२ – नवी दिल्ली)
•२०१०: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९२६)

  • जन्म :
    १८७९: संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९५५)
    १८३१ : महाराणी अवंतीबाई लोधी यांचा जन्म ( वीरमरण : २० मार्च, १८५८ )
    १९०४: हिंदी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९४८)
    १९५२: गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जन्म. ( मृत्यू : २२ जानेवारी , २०२२ )
    १९५४: पार्श्वगायिका हेमलता यांचा जन्म.
    १९५७: भारतीय वकील व राजकारणी आर. आर. पाटील यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)
    १९६८: भारतीय राजकारणी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »