पुढील तिमाहीसाठी महागाई भत्ता निश्चित, रू. ६१५९/-

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने साखर कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याचा आढावा घेऊन पुढील तिमाहीसाठी महागाई भत्त्याची रक्कम ६१५९ रुपये ६० पैसे निश्चित केली आहे.
साखर संघाने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना पाठविलेल्या पत्रात सुधारित महागाई भत्त्यानुसार कार्यवाही करण्यास सूचित केले आहे.
डेक्कन शुगर फॅक्टरीज असोसिएशन, साखर संघ व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कामगार प्रतिनिधी मंडळ यांच्यात १९८० मध्ये झालेल्या करारानुसार साखर कारखाना कामगारांच्या महागाई भत्त्याचा नियमित आढावा घ्यावा लागतो.
बदलणाऱ्या महागाई भत्त्यानुसार रक्कम निश्चित केली जाते. साखर कामगारांच्या मागण्यांसंदर्भात झालेल्या करारानुसार सुधारित दराने महागाई भत्ता देण्याबाबत संघाकडून कारखान्यांना कळविले जाते..