डॉ. बानू कोयाजी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज मंगळवार, जुलै १५, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक २४, शके १९४७
सूर्योदय : ०६:०९ सूर्यास्त : १९:२०
चंद्रोदय : २२:४२ चंद्रास्त : १०:०८
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माहआषाढ़
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : पञ्चमी – २२:३८ पर्यंत
नक्षत्र : शतभिषज – ०६:२६ पर्यंत
क्षय नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा – ०५:४६, जुलै १६ पर्यंत
योग : सौभाग्य – १४:१२ पर्यंत
करण : कौलव – ११:२१ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – २२:३८ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : कुंभ – २३:५८ पर्यंत
राहुकाल : १६:०२ ते १७:४१
गुलिक काल : १२:४४ ते १४:२३
यमगण्ड : ०९:२७ ते ११:०६
अभिजितमुहूर्त : १२:१८ ते १३:११
दुर्मुहूर्त : ०८:४७ ते ०९:४०
दुर्मुहूर्त : २३:४० ते ००:२३, जुलै १६
अमृत काल : २१:५९ ते २३:३३
वर्ज्य : १२:३९ ते १४:१३

मोगूबाई कुर्डीकर ह्या हिंदुस्तानी संगीतातील मराठी गायिका होत्या. त्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीत गायन करत असत. त्यांना आग्रा घराणे व जयपूर-अत्रौली घराणे ह्या दोन मातब्बर संगीत घराण्यांच्या शैलीतील संगीत शिकायला मिळाले. मोघूबाई या “ गानतपस्विनी” या उपाधीने ओळखल्या जातात.

मोगूबाईंची गायकी ही लयकारी व बोलतानांवर आधारलेली होती. स्वर व लयीची सुंदर गुंफण त्यांच्या गायनात आढळत असे. त्यांच्या आईने त्यांना

वयाच्या दहाव्या वर्षी गाणे शिकण्यासाठी जांबवली गावातील देवळात आलेल्या हरिदास साधूंकडे पाठविले व नंतर मोगूबाई व त्यांची आई जयश्रीबाई ‘चंद्रेश्वर भूतनाथ संगीत मंडळी’त नोकरी करू लागल्या. मायलेकींनी ‘भक्त ध्रुव’, ‘भक्त प्रल्हाद’ अशा अनेक नाटकांत भूमिका केल्या व पदे गायली. तिथे मोगूबाई काम करत असताना त्यांच्या आईचा देहान्त झाला.

पुढे ती संगीत मंडळी बुडीत निघाल्यावर मोगूबाईंनी ‘सातारकर स्त्री संगीत मंडळी’ ह्या नाटक कंपनीत काम सुरू केले. तिथे त्यांनी ‘पुण्यप्रभाव’ संगीतिकेत ‘किंकिणी’ची भूमिका, ‘सुभद्रा’ नाटकात ‘सुभद्रे’ची भूमिका अशा अनेक भूमिका केल्या. त्यांना ती नोकरी सोडावी लागली. गीत शिक्षणाच्या ध्यासाने त्या मुंबईस येऊन पोहोचल्या.

उस्ताद अल्लादिया खान यांच्यानंतर त्यांना उस्ताद बशीर खान व विलायत हुसैन खान ह्या आग्रा घराण्यातील विख्यात गायकांचे मार्गदर्शनही लाभले. नंतर त्या पुन्हा उस्ताद अल्लादिया खान यांचेकडे जयपूर घराण्याच्या शैलीतील गायनाची साधना करू लागल्या.

१९६९ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच भारत सरकारने इ.स. १९७४ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. इ.स. १९८० मध्ये त्यांना संगीत संशोधन अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला.

१९०४: जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी , २००१)

डॉ. बानू कोयाजी यांचे वडील पेस्तनजी कापडिया स्वतः एम.डी. होते. बानूबाईंनीही १९४६ मध्ये मुंबईतील प्रसिद्ध ग्रॅंट मेडिकल कॉलेज मधून एम.डी. झाल्या. त्यानंतर काही वर्षे त्यांनी पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम केले.
बानूबाई स्त्रीरोग आणि प्रसुतिशास्त्राच्या तज्ज्ञ होत्या. अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष रुग्णसेवेत त्यांना जास्त रस होता. बानू कोयाजी यांचे लग्न जहांगीर कोयाजी यांच्याशी झाले. त्यांचे मोठे दीर डॉ. एडलजी कोयाजी हे गरिबांसाठी अतिशय आस्थेने, मनापासून काम करीत. त्यांचे काम बघूनच वैद्यकीय ज्ञान केवळ पैसा मिळविण्याचे साधन नसून त्यातून समाजसेवा करणेही महत्त्वाचे आहे. याची बानूबाईंना जाणीव झाली.

आपल्या समाजात स्त्रियांच्या आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रश्न आहेत. भारतीय समाजाला स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतितज्ज्ञांची गरज आहे, हे जाणून व बानूबाईंच्या दिरांच्या सूचनेला मान देऊन त्यांनी आपल्या ज्ञानाची व कार्याची दिशा निवडली. प्रथम सहा महिन्यांसाठी बानूबाई के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये आल्या आणि कायमच्या के.ई.एम.च्या बनल्या. के.ई.एम. त्यांचे झाले. पुण्यातील के.ई.एम. म्हणजे डॉ.बानू कोयाजी असे समीकरणच तयार झाले.१९४० मध्ये केवळ ४० खाटा असणारे के.ई.एम. हॉस्पिटल डॉ.बानूबाईंनी १९९९ मध्ये ५५० खाटा टप्प्याटप्प्याने वाढवीत नेले.

डॉ.बानूबाईंनी आपले काम के.ई.एम. पुरते मर्यादित ठेवले नाही. आपल्या समाजातील स्त्रियांचे आरोग्य, त्या विषयीचे प्रश्न, त्यातील समस्या याविषयी त्यांना अचूक भान होते.

सन १९७८ पासून त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय कामाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. त्याआधी १९४० मध्ये श्री.र.धो. कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन काही वर्षे डॉ. बानूबाईंनी कुटुंबनियोजनाचे काम प्रतिकूल परिस्थितीत केले होते. तेच काम नव्याने त्यांनी ग्रामीण भागात करण्याचे ठरविले. वडू येथे त्यांनी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली. ७ ते ११ वर्षे वयोगटातील मुलींचा गट त्यांनी त्यासाठी निवडला होता. ६०० हून अधिक मुलींना त्यांनी प्रशिक्षित केले.

स्त्रियांना कुटुंबनियोजनाचे महत्त्व समजावे म्हणून शिबिरे भरवली. कुटुंबनियोजनाचा प्रसार केला. ३०० गावांमध्ये कुटुंबनियोजनाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध होईल असेही प्रकल्प बानूबाईंनी सुरू केले. डाॅ. बानू कोयाजी यांनी स्त्रियांसाठी ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या संस्थेची स्थापना केली. याशिवाय अनेक वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांशी बानूबाई संबंधित होत्या.

पुणे विद्यापीठाच्या विधिसभेच्या, तसेच विद्या परिषदेच्या त्या सदस्या होत्या. डॉ. बानू कोयाजी यांच्या कार्याचा एक स्वतंत्र विभाग होता. तो म्हणजे सकाळ वृत्तपत्र समूहात त्यांनी केलेले काम. ‘सकाळ’ चे संपादक डॉ. ना.भि. परुळेकर यांच्या विनंतीवरून डॉ. कोयाजी १९५५ पासून ‘सकाळ’ च्या संचालक मंडळात काम करू लागल्या. डॉ. परुळेकरांच्या निधनानंतर डॉ. कोयाजी ‘सकाळ’च्या संचालक झाल्या. ‘सकाळ’ पवार उद्योग समूहाकडे गेल्यानंतरही डॉ. कोयाजी ‘सकाळ’ संचालक मंडळाशी संबंधित होत्या. ‘सकाळ’चे इंडिया फाऊंडेशनसारखे सर्व उपक्रम व सकाळ रिलीफ फंड यांचे कामही बानूबाईंनी डॉ. परुळेकरांनंतर चालू ठेवले.

• २००४: कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक डॉ. बानू कोयाजी यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर, १९१७)

  • घटना :
    १६६२: इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या रॉयल सोसायटीची स्थापना झाली.
    १६७४: मुघल सरदार बहादूरशहा कोकलताशच्या ताब्यातील पेडगावाची सुमारे कोटीची लूट रायगडावर जमा झाली.
    १९२६: मुंबईतील कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू झाली.
    १९२७: र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
    १९५५: आण्विक अस्त्रांवर बंदी घालणाऱ्या मैनाऊ जाहीरनाम्यावर ५८ नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांच्या स्वाक्षऱ्या.
    १९६२: ज्ञानप्रबोधिनी संस्थेचा पुणे येथे प्रारंभ.
    २००६: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.

मृत्यू :
• १९६७: गायक व नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचे निधन. (जन्म: २६ जून १८८८)
• १९९१: संघ प्रचारक, जनसंघ व भाजपचे नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, वक्ते जगन्नाथराव जोशी यांचे निधन.
• १९९८: स्वातंत्र्यसैनिक ताराचंद परमार यांचे निधन.
• १९९९: पर्यावरणवादी लेखक जगदीश गोडबोले यांचे निधन.
• १९९९: सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई टिळक यांचे निधन.
• २०२४ : कोकुयो कॅमलिनचे चेअरमन एमेरिटस आणि देशातील कलाकार तसेच विद्यार्थ्यांमध्ये रंगत आणण्यासाठी ओळखले जाणारे सुभाष दांडेकर यांचे निधन.

  • जन्म :
    १६११: जयपूर चे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १६६७)
    १९०३: खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामराज यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७५)
    १९१५: भारतीय लष्करी सल्लागार काश्मीर सिंग कटोच यांचा जन्म.
    १९२७: विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून , २०१०)
    १९२९ : प्रा.डॉ. नारायण ज्ञानदेव पाटील ( एन.डी.पाटील ) यांचा जन्म ( मृत्यू : १७ जानेवरी , २०२२ )
    १९३२: विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९८२)
    १९३३: भारतीय लेखक आणि पटकथालेखक एम. टी. वासुदेवन नायर यांचा जन्म.
    १९३७: भारतीय पत्रकार श्री प्रभाज जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर २००९)
    १९४९: दलित साहित्यिक माधव कोंडविलकर यांचा जन्म.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »