डॉ. राहुल कदम यांच्या योगदानाची ‘ऑऊटलूक’कडून प्रशंसा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांनी साखर उद्योगासाठी दिलेल्या भरीव योगदानाची ‘आऊटलूक’ या प्रसिद्ध मॅगेझीनने दखल घेतली आहे. उत्पादकता वाढ आणि पर्यावरण रक्षणासाठी डॉ. कदम यांनी घेतलेल्या निर्णयांचे ‘आऊटलूक’ने कौतुक केले आहे.

‘व्हीजनरीज ऑफ ५ ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमी’ या विषयावर ‘आऊटलूक’ने जानेवारीत विशेष अंक प्रसिद्ध केला असून, त्यात भारतातील नामवंतांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये नंदन निलेकणी, आनंद महिंद्रा, नितीन गडकरी, डॉ. एस. जयशंकर, न्या. धनंजय चंद्रचूड आदी नामवंतांचा समावेश आहे. या यादीत डॉ. राहुल कदम यांचा समावेश होणे साखर उद्योगासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.

DR. RAHUL KADAM
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »