उसाला खूप पाणी लागते हा मोठा गैरसमज
नामवंत ऊस शास्त्रज्ञ – पैदासकार डॉ. पवार यांची विशेष मुलाखत
रविवार विशेष
पुणे : कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी शेती करून पाहावी, म्हणजे त्यांना शेतकऱ्यांच्या खऱ्या अडचणी समजून येतील, असा सल्ला नामवंत ऊस शास्त्रज्ञ – पैदासकार डॉ. सुरेशराव पवार यांनी दिला आहे. फुले ८६०३२, १०००१, २६५ आदी दहाहून अधिक वाणांचे संशोधन करणारे डॉ. पवार स्वत: शेती करतात आणि अनुभवातूनच शेतकऱ्यांना सल्ला देतात.
उसाच्या पिकाला प्रचंड पाणी लागते, अशा प्रचार काही मंडळी करतात; मात्र त्यात काही तथ्य नाही, हे मी केवळ ऊस संशोधक म्हणून नव्हे, तर ऊस उत्पादक शेतकरी म्हणूनदेखील ठामपणे सांगू शकतो, त्यामुळे उसाची बदनामी थांबवावी.
उलट ग्रामीण भागाचा कायापालट करणारे, शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देणारे ऊस हे एकमेव पीक आहे, ज्याच्याकडे दहा एकर शेती आहे, त्यांनी पाच एकर ऊस ठेवावा, असे डॉ. पवार यांनी ठासून सांगितले.
डॉ. सुरेशराव पवार यांनी ‘शुगरटुडे’ मॅगेझीनला (Sugartoday Magazine) दिलेली विशेष मुलाखत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे देणारी आहे. ती आवर्जून पाहा.
८६०३२ या वाणाचा जन्म कसा झाला, याबाबत त्यांनी दिलेली माहिती रंजक आहे.