‘न्यू एनर्जी, न्यू फ्यूचर…’ डीएसटीएचा २४ मे रोजी सेमिनार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : साखर उद्योग क्षेत्रातील नामांकित तंत्रज्ञ संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्‌स असो. (इंडिया) (DSTA) च्या वतीने ‘न्यू एनर्जी, न्यू फ्यूचर : दी नेक्स्ट जन शुगर कॉम्लेक्स’ या महत्त्वपूर्ण विषयावर शनिवार, दि. २४ मे २०२५ रोजी सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यातील हायट (हयात, आगा खान पॅलेस जवळ) येथे २४ मे २०२५ रोजी दुपारी २ वाजता हा सेमिनार होणार असून, तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. साखर उद्योग क्षेत्रातील निमंत्रित व्यक्तींनी या सेमिनारला उपस्थिती लावून डीएसटीएच्या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष (महाराष्ट्र) एस. एस. शिरगावकर, उपाध्यक्ष (गुजरात) एम.के. पटेल, उपाध्यक्ष (तांत्रिक) एस. डी. बोखारे यांनी केले आहे.

या सेमिनारसाठी नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ती ऑनलाइनदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी info@dstaindia.com किंवा exe.sec@dstaindia.com यावर नोंदणी करावी किंवा 9175916044 या क्रमांकावरदेखील नोंदणी करता येणार आहे.

कानपूरच्या राष्ट्रीय साखर संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. नरेंद्र मोहन हे सेमिनारच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमाचे प्रायोजक राज प्रोसेसेस आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »