घोडगंगा साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : शिरूर तालुक्यातील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कारखान्यावर प्रशासक नेमून गाळप सुरू करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे.

साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी चौकशीचे आदेश नुकतेच जारी केले. त्यांच्या आदेशात म्हटले आहे, की क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी घोडगंगा साखर कारखान्याबाबत तक्रार दाखल केली आहे, कारखान्यावर प्रशासक नेमून गाळप सुरू करावे, तसेच चेअरमन व संचालक मंडळाच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी म्हणून २७ डिसेंबर पासून धरणे आंदोलन आणि १ जानेवारी २०२४ पासून उपोषण करण्याचा इशारा तक्रारदाराने दिला आहे. तक्रारदाराने उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांबाबत चौकशी करावी आणि आठवड्यात अहवाल सादर करावा.

प्रादेशिक सहसंचालकांकडे चौकशीची जबाबदारी सुपूर्द केली आहे. या साखर कारखान्याचे संस्थापक कै. रावसाहेब पवार यांचे पुत्र आमदार अशोकबापू पवार यांच्या ताब्यात हा साखर कारखाना आहे. त्यांचे चिरंजीव ऋषिराज सध्या कारखान्याचे चेअरमन आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीचा मोठा फटका या कारखान्याला बसला असून, कोणत्या गटाकडे जायचे याबाबत आमदार महोदय द्विधा मन:स्थितीत असल्याची चर्चा आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »