भावी कार्यकारी संचालकांची मुख्य परीक्षा ४ मे रोजी होणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी ५० कार्यकारी संचालकांची नामतालिका बनवण्याचा दुसरा टप्पा आता सुरू झाला आहे. पहिल्या, म्हणजे चाळणी परीक्षेत उत्तीण झालेल्या उमेदवारांची दुसरी आणि अंतिम लेखी परीक्षा येत्या ४ मे २०२३ रोजी होणार आहे.
त्यानंतर मुलाखतींची प्रक्रिया सुरू होईल. यासंदर्भात वैकुंठ मेहता संस्थेने प्रसिद्ध केलेले निवेदन पुढीलप्रमाणे –

……………………………..
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान

VAIKUNTH MEHTA NATIONAL INSTITUTE OF CO-OPERATIVE MANAGEMENT
(A National Institute under the aegis of National Council for Cooperative Training (NCCT), Promoted by Ministry of Cooperation, Government of India)


क्र. वीम/सीआयटी / शुगर एमडी / २०२२-२३.

परिपत्रक


दिनांक: १७ एप्रिल २०२३

साखर आयुक्त, महाराष्ट्र शासन, पुणे यांच्या निर्देशांनुसार महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांसाठी ५० कार्यकारी संचालकांची नामतालिका (Panel) तयार करण्यासाठी दुस-या टप्प्यातील लेखी परिक्षेसाठी पात्र झालेल्या उमदेवारांची परिक्षा गुरुवार, दिनांक ४ मे २०२३ रोजी घेण्यात येईल. परिक्षेसाठी आवश्यक असणारी प्रवेशपत्रिका (Admit Card) प्रत्येक उमेदवाराने बरोबर आणणे आवश्यक आहे.
परिक्षेची सविस्तर माहीती खालीलप्रमाणे आहे:
परिक्षेचे केंद्र:
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था गणेशखिंड रोड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळ,
पुणे- ४११००७
परिक्षेची वेळ:
दु. २.३० ते ५.००
कालावधी:
२ तास ३० मिनीटे
एकुण गुणः
७५
एकुण प्रश्न :
५ ( उपप्रश्नांसहित)
परिक्षेला हजर राहण्याची वेळ:
दु. १.३० वाजता

परिक्षेला येतेवेळी ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स, पॅनकार्ड यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
सदरहू लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असेल परंतु परिक्षार्थीनी प्रश्नांची उत्तरे मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेत लिहीणे बंधनकारक आहे. तसेच परिक्षार्थीनी प्रश्नासमोर नमूद केलेल्या शब्दमर्यादेमध्येच उत्तर लिहिणे आवश्यक आहे.
दुस-या टप्प्यातील लेखी परिक्षेतील सर्वोच्च गुणधारक उमेदवार १:३ पध्दतीने तोंडी परिक्षेस पात्र असतील. परंतु सदर पात्रतेसाठी उमेदवारांनी लेखी परिक्षेमध्ये ७५ पैकी किमान २७ गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
सदर लेखी परिक्षा प्रक्रियेबाबत काही उणिवा / त्रुटी असल्यास त्याची दुरुस्ती करुन वेळोवेळी वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल.
प्रस्तुत लेखी परिक्षेबाबत काही तक्रारी / वाद उद्भवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार शासन निर्णय दि. १८/४/२०२२ नुसार गठित केलेल्या समितीस राहतील. राष्ट्रीय
कारी प्रबंध पुणे- ७
(यशवंत पाटील)
प्रकल्प संचालक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »