‘अंत्योदय’ अंतर्गत साखरेवरील अनुदानाला मुदतवाढ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत (AAY) साखरेसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाला (सबसिडी) केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत एकूण रू. १८५० कोटी अनुदान दिले जाईल.
साखर अनुदान योजनेंतर्गत, यात सहभागी राज्यांमधील AAY कुटुंबांना प्रति किलो साखरेसाठी, प्रति महिना ₹18.50 अनुदान दिले जाते. या योजनेला आणखी दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आहे.
या मंजुरीमुळे १५ व्या वित्त आयोगाच्या कालावधीत (२०२०-२१ ते २०२५-२६) ₹१,८५० कोटींहून अधिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
त्याचबरोबर पशुसंवर्धन पायाभूत विकास फंड या योजनेला तीन वर्षांसाठी मुदतवाढ देऊन, त्यावर २९ हजार ६१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे दुग्धप्रक्रिया व्यवसायाला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »