उसाच्या ट्रॅक्टरचे टायर फोडले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

वाढीव दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे

सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उसाला अधिक दर मिळावा यासाठी आंदोलन सुरू केले आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या सुमारे डझनभर ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्य सरकारने त्यांच्या मागणीकडे लक्ष देऊन प्रश्न सोडवावा, अशी आंदोलन करणाऱ्या ऊस उत्पादनकाची मागणी त्यांनी केली आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, बुधवारी रात्री सोलापूरमधील वाखरीजवळ अज्ञात व्यक्तींनी ट्रॅक्टर-ट्रॉलीचे 11 टायर फोडले, परंतु ट्रॅक्टर मालकाने तक्रार दाखल केलेली नाही.

सोलापूर जिल्हा ऊस दर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली विविध शेतकरी संघटना सध्याच्या 2,100 ते 2,300 रुपयांच्या तुलनेत उसाला प्रतिटन 3,100 रुपये दर देण्याची मागणी करत आहेत, अशी माहिती आंदोलनकर्त्या संघटनेच्या एका सदस्याने गुरुवारी दिली.

शेतकरी समर्थक संघटनांनी वाहतूकदारांना ऊस तोडणी शेतातून साखर कारखान्यांकडे न नेण्याचे आवाहनही केले होते.

“अलीकडेच, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 20,000 ऊस उत्पादकांची परिषद झाली. बैठकीत आम्ही शेतकऱ्यांना 3 हजार 100 रुपये प्रतिटन दर मिळावा, अशी मागणी केली. शेतकऱ्याला पहिला हप्ता म्हणून 2,500 रुपये आणि अंतिम बिलाच्या वेळी उर्वरित 600 रुपये मिळावेत, अशी आमची मागणी होती,” असे शेतकरी समर्थक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य सचिन पाटील यांनी सांगितले. परंतु, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने या मागणीची दखल घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला.

“साखर कारखानदारांनी कारखान्यांपर्यंत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना भडकावण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हतबल होत चालले आहेत, कारण महागाई आणि खतांच्या वाढत्या किमतीमुळे निविष्ठाचा खर्च खूप जास्त आहे,” असे पाटील म्हणाले.

‘‘त्यामुळे बुधवारी सायंकाळी उशिरा सोलापुरातील पंढरपूर शहराजवळील वाखरी येथे कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फुटले, परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष द्यावे. सरकार आणि स्थानिक प्रशासनाने आंदोलकांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवावा,” असे ते म्हणाले..

वाखरीतील थोरात पेट्रोल पंपासमोर या ट्रॅक्टरचे सर्व टायर धारदार सुऱ्याने फोडल्याचे पोलिसांना आढळून आले. हा ट्रॅक्टर पांडुरंग साखर कारखान्याचा आहे, असे सांगितले जाते. या कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक दर दिला असताना त्याचे ऊस वाहतूक वाहन का निकामी करण्यात आले, असा सवाल कारखान्याच्या बाजूने असलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »