शेतकऱ्याने एकरी १०० टन उसाचे उत्पादन काढले पाहिजे : थोरात

संगमनेर : ८०० मे. टनापासून सुरू झालेल्या या कारखान्याने ५५०० मे. टन क्षमता व ३० मेगावॅट वीज निर्मिती सुरू केली. आज आदर्शवत पद्धतीने काम सुरू असून प्रत्येक शेतकऱ्याने एकरी १०० टन उत्पादन काढले पाहिजे. अनेक अडचणींवर मात करून मोठ्या कष्टातून निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. ज्यांनी या कामात कोणतीही योगदान दिले नाही, ते आता जलदूत व्हायला निघाले आहेत, अशी टीकाही काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, माजीमंत्री बाळासाहेब थोरात त्यांनी केली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, अॅड. माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, आर. बी. रहाणे, लहानभाऊ गुंजाळ, बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात, गणपतराव सांगळे, डॉ. जयश्री थोरात, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, के. के. थोरात, कारखान्याचे संचालक संतोष हासे, इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे, तुषार दिघे, विनोद हासे, सतिश वर्षे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विजय राहणे, गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, अंकुश ताजने, दिलीप नागरे, लताताई गायकर, सुंदराबाई डूबे, बंडूनाना भाबड, मदन आंबरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे उपस्थित होते.
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीबाबत अजूनही कुणाला विश्वास नाही, अशी परिस्थिती आहे. तालुका शांततेने प्रेमाने परिवार म्हणून आपण सांभाळला. मात्र हा विकास काही लोकांना पाहवत नाही. येथे अशांतता निर्माण केली जात आहे. खोट्या केसेस टाकल्या जात आहेत. संघर्षाचा इतिहास आहे, कोणी विसरू नका. आपली चांगल्या राजकारणाची विकासाची परंपरा जपण्यासाठी सर्वांनी भक्कमपणे पाठीशी उभे रहा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
एकेकाळी दुष्काळी तालुका ही ओळख होती. मोठ्या कष्टातून आणि संघर्षातून आणि चाळीस वर्षात एकही दिवस सुट्टी न घेता अविश्रांत कामातून समृद्ध आणि वैभवशाली संगमनेर तालुका उभा केला आहे. चाळीस वर्षे शांत आणि विकासाची वाटचाल करणाऱ्या तालुक्यात सध्या काय सुरू आहे? याचा प्रत्येकाने विचार करा. तालुक्याची शांतता बिघडविणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करा, असे आवाहन करताना तालुक्याला कष्टाचा व संघर्षाचा इतिहास आहे, तो विसरु नका, असा टोलाही विरोधकांना माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
यावेळी माजी आ. डॉ. सुधीर तांबे, सदाशिव नवले, तात्याबा बोराडे, भास्कर वर्षे, संग्राम जोंधळे, अण्णा राहिंज, बाळासाहेब देशमुख, मोहनराव करंजकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी, तर इंद्रजीत थोरात यांनी आभार मानले.






