‘सह्याद्री’चे वित्त सल्लागार एच. टी. देसाई यांचे निधन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे वित्त सल्लागार (फायनान्शिअल ॲडव्हायझर) हिंदुराव तातोबा देसाई (एच.टी.देसाई)  २३ जुलै रोजी दु:खद निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. कराड तालुक्यातील सुपणे गावचे ते रहिवासी होते. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, पत्नी, मुलगा, मुली, पुतने, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

हिंदुराव देसाई हे 7 जानेवारी 1974 रोजी सह्याद्रि कारखान्यामध्ये क्लार्क पदावर रूजू झाले होते, तद्‌नंतर त्यांनी कारखान्याकडे असि.अकौन्टंट, चीफ अकौन्टंट, प्रभारी कार्यकारी संचालक अशा विविध पदांवर जवळपास 40 वर्षे सेवा बजावली होती. तसेच ते विस्तार वित्त आणि कर सल्लागार या पदावर कार्यरत होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »