ऊसतोडणी मजूर पुरवण्याच्या नावाखाली फसवणूक; १० जणांवर गुन्हा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सांगली : राज्‍यात सध्या ऊस हंगाम जोरात सुरू आहे. यासाठी मजुरांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कवठेपिरान येथील अनिकेत वडगावे या तरुण शेतकऱ्याला जळगावच्या एका टोळीने सव्वा सहा लाखांचा चुना लावला आहे. अनिकेत वडगावे यांनी संशयित १० जणांविरोधात सांगली पोलिसांत फियाद दिली आहे.  पोलिसांनी अधिक तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, ऊस तोडणीसाठी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून कवठेपिरान (ता. मिरज) येथील शेतकरी अनिकेत श्रीबाळ वडगावे यांची ६ लाख ३२ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दहीवद येथील १० संशयितांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रवींद्र गिरधर भिल (वय ३५), साजन संजय भिल (२७), अनिल रमेश भिल (३०), निलेश संजय भिल (२५), लक्ष्मण सुकलाल भिल (४१), अर्जुन रामकृष्ण भिल (२२), दिनेश नाना भिल (२५), अनिल सुरेश भिल (३०), नितीन संजय भिल (३२) आणि दीपक ज्ञानेश्वर भिल (३०, सर्व रा. दहीवद, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. २०२५-२६ च्या हंगामासाठी करार करूनही मजूर न पाठवता ही रक्कम हडप करण्यात आली. या टोळीने जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांनाही अशाच प्रकारे गंडा घातल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »