एफआरपी पुस्तिकेचे अजितदादांच्या हस्ते प्रकाशन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार आणि साखर सहसंचालक मंगेश तिटकारे यांनी लिहिलेल्या ‘एफआरपी माहिती पुस्तिका २०२४’चे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत झाले.

मंत्रिसमितीच्या बैठकीनंतर साखर उद्योगातील मान्यवरांच्या उपस्थितीत अजितदादांनी पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, सहकार खात्याचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आदी उपस्थित होते.

श्री. तिटकारे यांनी ‘इक्षुदंड ते इथेनॉल’ सारख्या सहकार आणि साखर उद्योग क्षेत्रासंबंधी अनेक पुस्तकांचे लेखन आणि सहलेखन केले आहे. त्यांचे ‘शुगरटुडे’मधील ‘शर्करायन’ हे सदर अत्यंत वाचकप्रिय आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »