गजानन दिगंबर तथा गदिमा
आज रविवार, ऑक्टोबर १, २०२३ युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन ९ शके १९४५
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:२९ सूर्यास्त : १८:२७
चंद्रोदय : १९:५७ चंद्रास्त : ०८:११
शक सम्वत : १९४५ शोभन
ऋतू : वर्षा
चंद्र माह : भाद्रपद
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : द्वितीया – ०९:४१ पर्यंत
नक्षत्र : अश्विनी – १९:२७ पर्यंत
योग : व्याघात – १३:१४ पर्यंत
करण : गर – ०९:४१ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – २०:३४ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : मेष
राहुकाल : १६:५७ ते १८:२७
गुलिक काल : १५:२८ ते १६:५७
यमगण्ड : १२:२८ ते १३:५८
अभिजितमुहूर्त : १२:०४ ते १२:५२
दुर्मुहूर्त : १६:५१ ते १७:३९
अमृत काल : १२:४६ ते १४:१५
वर्ज्य : १५:४४ ते १७:१३
वर्ज्य : ०४:३८, ऑक्टोबर ०२ ते ०६:१०, ऑक्टोबर ०२
आज जागतिक शाकाहार दिन आहे.
आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींची आपण किती काळजी घेतो? हा प्रश्न एकदा स्वत:लाच विचारून पाहा. घरातील लहान मुलांशी आपण आवर्जून गप्पा मारतो. आज तु शाळेत काय गंमत केलीस असे त्यांना आवर्जुन विचारले जाते. पण त्याच घरातील वृद्धांची साधी विचारपूसही होत नसते. त्यांच्याशीदेखील कधीतरी मनमोकळ्या गप्पा मारून बघा. तुम्हाला व त्यांना एक नवीन मित्र सापडेल कदाचित. तुमची एखादी जुनी आठवणही ते तुम्हाला सांगतील. कारण हा काळ त्यांच्यासाठी तसा आठवणीत रमण्यासारखाच असतो.
आज वृद्ध नागरिक दिन आहे.
थकवा आल्यानंतर फ्रेशनेस आणण्यासाठी असो वा, मिटिंगमध्ये दीर्घ काळ चर्चा करणे असो, कॉफीचा कप सोबतीला असतोच. कॉफीचे महत्त्व आता वाढते आहे. यामुळे काही वर्षे आधी जेमतेम १० किंवा १५ रुपये असलेली तयार कॉफीची किंमतही आता तीन अंकात गेली आहे.
आज आंतरराष्ट्रीय कॉफी दिन आहे.
पृथ्वीवर प्रचंड जैवविविधता आहे. परंतु जंगलतोड, वाढते शहरीकरण, पशुपक्ष्यांच्या अधिवासांवर मानवी आक्रमण यांसारख्या बाबींमुळे हल्ली माणसाचा जंगली प्राण्यांशी संबधच येत नाही आणि येतो तेव्हा दोन्ही बाजूंना फारसा आनंददायक नसतो ! ही परस्थिती बदलण्यासाठीचे या सप्ताहाच्या निमित्ताने होत आहेत.
१ आक्टोबर ते ७ आक्टोबर : वन्य जीव सप्ताह आहे
वेदमंत्राहून आम्हां वंद्य, वंदे मातरम् ॥
वेदमंत्राहून आम्हां, वंद्य वंदे मातरम् , वंद्य वंदे मातरम् ॥ध्रु॥
माउलीच्या मुक्ततेचा, यज्ञ झाला भारती ।
त्यात लाखो वीर देती, जीविताच्या आहुती ।
आहुतींनी सिद्ध केला, मंत्र वंदे मातरम् ॥१॥
याच मंत्राने मृतांचे, राष्ट्र सारे जागले ।
शस्त्रधारी निष्ठुरांशी, शांतीवादी झुंजले ।
शस्त्रहीना एक लाभे, मंत्र वंदे मातरम् ॥२॥
निर्मिला हा मंत्र ज्यांनी, आचरीला झुंजुनी ।
ते हुतात्मे देव झाले, स्वर्गलोकी जाउनी ।
गा तयांच्या आरतीचे, गीत वंदे मातरम् ॥३॥ – ग. दि. मा.
गदिमांनी तब्बल १५८ मराठी चित्रपटांसाठी कथालेखन केले, यातील अनेक चित्रपटांच्या कथा-पटकथा व संवादही त्यांच्याच लेखणीतून उतरले. मात्र त्यांचा संचार केवळ मराठी चित्रसृष्टीतच नव्हता, तर हिंदीतही त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यांच्या कथेवर सुमारे २५ हिंदी सिनेमांची निर्मिती झाली असून त्यात ‘तुफान और दिया’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, ‘आदमी सडक का’ आदींचा समावेश आहे. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’ची मूळ कथाही गदिमांचीच होती, तर राजेश खन्नाचा ‘अवतार’ व अमिताभ-राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथाही याच शब्दप्रभूची!
गदिमांच्या अनेक गीतांमध्ये जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या शब्दांत मांडलेलं दिसतं. ‘दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा’ या पंक्ती मानवी जीवनाचं सार आहेत.
‘जगाच्या पाठीवर’ची गीते तर पराकोटीच्या तत्त्ववेत्त्याने लिहिल्यासारखी वाटतात. ‘इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना परी चिरंजीविता, बोरी-बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार, अजब तुझे सरकार’.. किंवा ‘एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे’.. असो, गदिमांची चिंतनशील वृत्ती यात दिसून येते. ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई, कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही’ यासारखं कटू सत्य सांगणारं गीत तर त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नदिनी लिहिलं आहे!
१९१९ : गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार , अभिनेते व गीत रामायणकार – आधुनिक वाल्मिकी गजानन दिगंबर तथा गदिमा यांचा जन्म ( मृत्यू : १४ डिसेंबर, १९७७ )
इक दिन बिक जाएगा, माटी के मोल
जग में रह जाएंगे, प्यारे तेरे बोल
दूजे के होंठों को, देकर अपने गीत
कोई निशानी छोड़, फिर दुनिया से डोल
इक दिन बिक जायेगा …
गझलकार : मजरूह यांना सुरुवातीला पारंपरिक मद्रसांतून धार्मिक शिक्षण देण्यात आले. अरबी, फार्सी, उर्दू या भाषांचे पारंपरिक शिक्षण घेऊन त्यांनी त्यांवर प्रभुत्व मिळविले. हिंदी व इंग्रजी भाषाही त्यांना उत्तम अवगत होत्या. त्यानंतर त्यांनी लखनौ येथील युनानी महाविद्यालयात युनानी वैद्यकाचे शिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी हकीम म्हणून वैद्यक व्यवसाय सुरू केला व त्याच वेळी मुशायऱ्यांमधून ते आपल्या गझला सादर करू लागले. उर्दू काव्यक्षेत्रात मजरूह यांना गझलकार म्हणून महत्त्वाचे स्थान आहे.
त्यांनी सुरुवातीच्या काळात विपुल गीते व कविता लिहिल्या; मात्र १९४५ पासून गझल लेखनावर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांनी लिहिलेल्या गझलांचा संग्रह उर्दू गझल या शीर्षकाने १९५३ मध्ये प्रकाशित झाला. पुढे त्यात वेळोवेळी नव्या गझलांची भर घालून त्याच्या अनेक आवृत्त्या काढण्यात आल्या.
गझल या रचनाप्रकाराचा पारंपरिक, सांकेतिक बाज व अभिजात बहुढंगी समृद्ध वारसा त्यांनी आपल्या गझलांतून जोपासला आणि त्याच वेळी त्यांच्या आशयाची व्याप्ती व अभिव्यक्तीचे सामर्थ्य वाढविले. गझलेला त्यांनी नवी दिशा दिली व मार्क्सवादी विचार सूचकतेने या रचनाप्रकारातून व्यक्त केले. मानवी प्रतिष्ठेचे भान व जग बदलण्याचा विश्वास त्यांनी गझलरचनेतून व्यक्त केला. १९४५ पासून प्रागतिक लेखक चळवळीलाही त्यांनी भरीव पाठिंबा दिला.
मजरूह यांना दोस्ती या चित्रपटातील ‘चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे’ या गीतासाठी फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून पारितोषिक मिळाले (१९६५), तसेच एकूण कारकीर्दीसाठी ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार’ हा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला (१९९३).
चित्रपटगीते एका टोकाला अर्थहीन तालबद्ध स्वरव्यंजनापासून ते अर्थघन शाब्दिक अभिव्यक्तिपर्यंत विस्तारलेली दिसतात. त्यामध्ये भावगीतापासून सखोल जीवनदर्शनापर्यंत अभिव्यक्तींचा पट मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांमध्ये दिसतो. त्यांच्या चित्रपट गीतलेखनाच्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांसाठी हजारो गीते लिहिली आणि त्या काळातील आघाडीच्या नामवंत संगीत दिग्दर्शकांनी त्यांची गीते स्वरबद्ध केली. त्यांत रोशन, आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल इत्यादींचा समावेश आहे.
१९१९ : दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते गीतकार, शायर मजरुह सुलतान पुरी यांचा जन्म ( मृत्यू : २४ मे, २००० )
घटना :
१७९१ : फ्रेंच संसदेचे पहिले अधिवेशन सुरु झाले
१८३७ : भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरु झाले
१८६९ : ऑस्ट्रिया मध्ये पहिल्यांदा पोस्ट कार्डचा वापर सुरु झाला.
१८८० : थॉमस एडिसनने दिव्याचा पहिला कारखाना सुरु केला
१८९१ : स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली
१९४३ : दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौंजेने नेपल्स शहरावर ताबा मिळवला
१९४६ : युनाइटेड किंग्डम मध्ये मेन्सा इंटरनॅशनल ची स्थापना झाली
१९५८ : भारतात दशमान ( मेट्रिक ) पध्द्त वापरण्यास सुरवात झाली
१९५८ : नासाची स्थापना करण्यात आली
१९६० : नायजेरिया देशाला युनाइटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य मिळाले
१९६९ : काँनकॉर्ड विमान प्रथमच ध्वनी वेगापेक्षा जोरात उडण्यात यशस्वी झाले
१९७१ : अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले
१९७९ : अमेरिकेने पनामा कालवा पनामाच्या हवाली केला.
१९८२ : सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेअर प्रकाशित केले
१९९२ : कार्टून नेटवर्क सुरु झाले.
• मृत्यू :
१९३१ : नाट्य छटाकार काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांचे निधन ( जन्म : १८ जानेवारी, १८८९ )
जन्म :
१८४७ : विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक अॅनी बेझंट यांचा जन्म ( मृत्यू : २० सप्टेंबर, १९३३ )
१९०४ : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सहसंस्थापक नेते, खासदार ए . के . गोपालन यांचा जन्म ( मृत्यू : २२ मार्च , १९७७ ) १९०६ : संगीतकार व गायक सचिन देव बर्मन यांचा जन्म ( मृत्यू : ३१ ऑक्टोबर, १९७५ )
१९१८ : रा. स्व. संघाचे कार्य नेपाळ, केनिया देशांमध्ये रुजवणारे, संघाच्या विश्व विभागाचे भीष्माचार्य तसेच १९४२ पासून संघासाठी प्रचारकी जीवनाचे व्रत घेतलेले श्री . लक्ष्मणराव भिडे यांचा जन्म. ( मृत्यू : ७ जानेवारी, २००१ )
१९२८ : दाक्षिणात्य अभेनेते, विझूपूरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन यांचा जन्म ( मृत्यू : २१ जुलै, २००१ )
१९३० : कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेव हलप्प तथा जे एच पटेल यांचा जन्म ( मृत्यू : १२ डिसेंबर, २००० )