गंगामाई शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या डिस्टिलरीला आग

आवडल्यास ही बातमी शेअर करा

औरंगाबाद : औरंगाबाद व नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गंगामाई शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या डिस्टिलरीला आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही, असे डिस्टिलरी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

गंगामाई कॉलनी युनिटपासून अगदी जवळ आहे, तिथे शिफ्ट इंजिनिअर श्री ठोंबरे यांनी तातडीने निर्णय घेऊन कॉलनीची भिंत तोडून सर्व कामगारांना बाहेर काढले व सर्वाना सुरक्षित स्थळी हलवले.
तर काही जणांना शेवगावमध्ये स्थलांतरित केले आहे. आग कमी झालेली असली तरी अजून पूर्णपणे आटोक्यात आलेली नसल्याचे रात्री उशिरा सांगण्यात आले.

कृपया अफवा पसरू नका, कोणत्याही प्रकारची जीवित हानी गंगामाई येथे झालेली नाही. लोक संभम्रात पडतील, अशी माहिती पसरवू नये, असे आवाहन कारखान्याने केले आहे.


व्हिडिओ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »