श्री दत्त कारखान्यावर गणपतराव दादांचेच वर्चस्व

कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत चेअरमन गणपतराव दादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री दत्त शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवत सत्ता कायम राखली. विरोधी अंकुश संघटनेच्या श्री दत्त बचाव पॅनलचा दारूण पराभव झाला.
कारखान्याच्या २१ संचालकांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील सत्ताधारी पॅनलचे तीन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १८ जागांसाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. २६ हजार ७२६ मतदारांपैकी गुरूवारी १६ हजार ६०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भरपावसातही मतदारांनी रांगा लावून मतदान केले.
संचालक मंडळाच्या निवडणुकीत आज शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात ६२.३७ इतके मतदान झाले भर पावसातही मतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळी सात वाजता ६७ मतदान केंद्रावर मतदानास सुरुवात झाली सकाळी १० वाजेपर्यंत मतदारांच्या मोठ्या रांगा मतदान केंद्रावर दिसून येत होत्या. नद्यांना पुराचे पाणी येऊन मार्ग बंद झाल्याने देखील कर्नाटकातून मोठ्या संख्येने सभासद वाहनातून मतदान करता येत होते.
२५ जुलै रोजी सकाळी सात वाजता कारखाना परिसरातील आरोग्य केंद्रासमोरील ११ नंबर गोडाऊन मध्ये मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीपासून सत्ताधारी पॅनलचे उमेदवार आघाडीवर राहिले आणि मोठ्या मताधिक्यानी निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ संपत खिलारी व सुनील धायगुडे यांनी काम पाहिले.
उद्यान पंडित गणपतराव अप्पासाहेब पाटील यांच्यावरच मतदारांनी पुन्हा विश्वास टाकत श्री दत्त कारखाना त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाकडे सोपवला आहे. त्याबद्दल पाटील यांनी मतदारांचे आभार मानले.
विजयी उमेदवार :
गणतपराव पाटील (१३१०७), अमर बाबाजी यादव (१३२२३), अनिलकुमार यादव (१३२८६), अरुणकुमार देसाई (१३१८१), बाबासाहेब पाटील (१३१६५), बसगोंडा पाटील (१२९५७), दरगू माने गावडे (१२९४०), जोतिकुमार पाटील (१२६९७), निजामसो गौस पाटील (१२६५६), प्रमोद पाटील (१२९८३), रघुनाथ पाटील (१२८९०), शरदचंद्र पाठक (१२७८८), शेखर पाटील (१२७४०), सिद्धगोंडा पाटील (१२५३५), विनया घोरपडे (१२६५६), विश्वनाथ माने (१२२२३), अस्मिता पाटील (१४७८३), संगीता पाटील (१४२६०),