अजित पवारांचा एक फोन, अन् ‘शोले’ आंदोलन मागे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे: शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्या शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे गेल्या १६ महिन्यांपासून पगार रखडलेले आहेत. आज कारखाना प्रशासनाने पंचिंग मशीन देखील बंद केले होते. त्यामुळे वैतागून कारखान्याच्या तीन कामगारांनी “शोले” स्टाईल आंदोलन करत आंदोलन करत कारखान्याच्या उंच धुराडीवर बसल्याने शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली. तब्बल दहा तास या कामगारांनी हे आंदोलन केले. अखेर अजित पवार यांच्या एका फोनमुळे कामगारांनी आंदोलन थांबवले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या वर्षी कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने गळीत हंगाम सुरू होऊ शकला नाही. त्यातच कामगारांचे काही दिवसांपूर्वी थकीत १६ महिन्यांचा पगार आणि इतर मागण्यासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर या संदर्भात बैठक देखील पार पडली होती. त्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र सांगून देखील या कामगारांकडून मागण्या पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे अखेर कारखाना कामगार तात्यासाहेब शेलार, महेंद्र काशिद, संतोष तांबे यांनी थेट उंच असलेली धुराडी यावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.

आमचे पगार जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा या कामगारांनी घेतला होता. अखेर सायंकाळी उशिरा या कारखान्याच्या आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर हा कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे, माजी संचालक सुधीर फराटे इनामदार यांसह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे यांनी हा प्रकार घातला. त्यानंतर अजित पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता या प्रश्नांबाबत कामगार आयुक्तांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर या वर चढलेल्या तीन कामगारांनी आंदोलन मागे घेत खाली उतरले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »