इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध मागे, पण मेख मारलीच

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : मागच्या डिसेंबर महिन्यात इथेनॉल उत्पादनाबाबत लादलेले निर्बंध केंद्र सरकारने २९ ऑगस्ट रोजी मागे घेतले. त्याचे साखर उद्योगाने जोरदार स्वागत केले. मात्र हे निर्बंध हटवताना, हा निर्णय कायमस्वरूपी नसून, केवळ २४-२५ या हंगामासाठी (इथेनॉल पुरवठा वर्ष) असल्याचे आदेशात नमूद करून बारीक मेख मारण्यात आली आहे. शिवाय देशांतर्गत साखर साठा पुरेसा राहतो की नाही, यावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.

केंद्र सरकारने, 29 ऑगस्ट रोजीच्या पत्रकाद्वारे, इथेनॉल उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशाने ESY (इथेनॉल पुरवठा वर्ष) 2024-25 साठी उसाचा रस, तसेच शुगर सिरप, बी हेवी मोलॅसेस इथेनॉलकडे वळवण्याबाबत घातलेली मर्यादा काढून टाकली. इथेनॉल पुरवठा वर्ष (ईएसवाय) डिसेंबर ते नोव्हेंबर या कालावधीचे असते.

केंद्रीय अन्नपुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार, “ईएसवाय 2024-25 दरम्यान साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरींना उसाचा रस/साखर सिरप, बी-हेवी मोलॅसेस तसेच सी-हेवी मोलॅसेसपासून इथेनॉल तयार करण्याची परवानगी आहे.”

DFPD (अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग), MoPNG (पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय) च्या समन्वयाने, देशातील साखर उत्पादनाच्या तुलनेत साखरेच्या इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्याचा वेळोवेळी आढावा घेईल, जेणेकरून त्या वर्षी – देशांतर्गत वापरासाठी साखरेची उपलब्धता मुबलक राहील की नाही याची खातरजमा करेल, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

  • दरम्यान, 29 ऑगस्ट रोजी एका वेगळ्या अधिसूचनेत, DFPD ने म्हटले आहे की इथेनॉल डिस्टिलरींसह FCI (भारतीय अन्न महामंडळ) च्या तांदूळ लिलावात खासगी व्यापाऱ्यांना देखील भाग घेण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
  • डिस्टिलरीजना ई-लिलावात भाग घेण्याची आणि ऑगस्ट-ऑक्टोबर 2024 दरम्यान दर आठवड्याला तांदळाच्या अंतिम लिलावाच्या दरानुसार तांदूळ उचलण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
  • FCI तांदूळ फीडस्टॉक म्हणून वापरून OMC द्वारे संबंधित डिस्टिलरींना इथेनॉलचे वाटप करण्याच्या अधीन राहून तांदूळ उचलण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते.
  • इथेनॉल डिस्टिलरीजमध्ये उचलण्यासाठी जास्तीत जास्त 23 LMT तांदूळांना परवानगी दिली जाऊ शकते.

भारताने चालू वर्षासाठी इथेनॉल-पेट्रोल मिश्रणाचे १५ टक्के उद्दिष्ट ठरवले आहे, डिसेंबरच्या इथेनॉल निर्बंध निर्णयामुळे हे लक्ष्य चुकवण्याची शक्यता निर्माण झाल्याने, सरकारने हा ताजा निर्णय घेतला आहे. केंद्राने इथेनॉल-पुरवठा वर्ष 2023-24 साठी मोलासेसपासून बनवलेले इथेनॉल तेल विपणन कंपन्यांकडे (OMC) 1.7 दशलक्ष टन (MT) पर्यंत वळवण्याचे मर्यादित केले होते.
दरम्यान, या ताज्या निर्णयाचे इस्मा, विस्मा, राज्य साखर संघ, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आदींनी स्वागत केले आहे.

पाठपुराव्याला यश : पाटील
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा, पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आमच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह व सहकारमंत्री शहा यांचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम वेळेत मिळेल, तसेच कारखान्यांना आर्थिक पाठबळ मिळेल, अशी अशाही त्यांनी व्यक्त केली.

हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया खालील लिंकवर पाहा.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »