भारतीय नववर्ष प्रारंभ

आज गुरुवार, मार्च १९, २०२६ युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन २८, शके १९४८
सूर्योदय :०६:४४ सूर्यास्त :१८:४९
चंद्रोदय : ०६:४६ चंद्रास्त : १९:०९
शक : १९४८
संवत्सर :पराभव
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : फाल्गुन / चैत्र
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : अमावस्या – ०६:५२ पर्यंत / (चैत्र शु १ )
क्षय तिथि : प्रतिपदा – ०४:५२, मार्च २० पर्यंत
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा – ०४:०५, मार्च २० पर्यंत
योग : शुक्ल – ०१:१७, मार्च २० पर्यंत
करण : नाग – ०६:५२ पर्यंत
द्वितीय करण :किंस्तुघ्न – १७:५५ पर्यंत
क्षय करण : बव – ०४:५२, मार्च २० पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : मीन
राहुकाल : १४:१७ ते १५:४८
गुलिक काल : ०९:४५ ते ११:१६
यमगण्ड : ०६:४४ ते ०८:१४
अभिजित मुहूर्त : १२:२२ ते १३:११
दुर्मुहूर्त : १०:४५ ते ११:३४
दुर्मुहूर्त : १५:३६ ते १६:२४
अमृत काल : २३:३२ ते ०१:०३, मार्च २०
वर्ज्य : १४:२६ ते १५:५७
। नूतन वर्षारंभस्य शुभचिंतनम् ।
आज पराभव संवत्सर, उत्तरायण, वसन्त ऋतू, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा. म्हणजे गुढीपाडवा.
महाराष्ट्रात, चंद्राच्या तेजस्वी अवस्थेच्या पहिल्या दिवसाला गुढी पाडवा ( मराठी : गुढी पाडवा ), पाडवो ( कोकणी : पाडयो ; कन्नड : ಪಾಡ್ಯ ; तेलुगु : పాడ్యమి ) म्हणतात. कोंकणी हिंदू वेगवेगळ्या प्रकारे या दिवसाला सौसार पडवो किंवा सौसार पडयो (अनुक्रमे सौसार पाडवो आणि सौसार पाड्यो) म्हणून संबोधतात. कर्नाटकातील कन्नड हिंदू याला [उगादी]] (युगादि/ ಯುಗಾದಿ), हिंदू प्रसंगी उगादि , त्याच प्रसंगी साजरा करतात . सिंधी लोक हा दिवस चेतीचंद म्हणून साजरा करतात , हा दिवस झुलेलालच्या उदयाच्या दिवसाच्या रूपात साजरा केला जातो . झुलेलालला प्रार्थना केली जाते आणि ताहिरी (गोड भात) आणि साईभाजी सारखे स्वादिष्ट पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो .
तथापि, हे सर्व हिंदूंसाठी सार्वत्रिक नवीन वर्ष नाही. काहींसाठी, जसे की गुजरातमधील आणि जवळच्या लोकांसाठी, नवीन वर्षाचे उत्सव पाच दिवसांच्या दिवाळी सणासोबतच येतात.
इतर अनेकांसाठी, हिंदू चंद्र सौर दिनदर्शिकेच्या सौर चक्र भागानुसार, नवीन वर्ष वैशाखी रोजी १३ ते १५ एप्रिल दरम्यान येते आणि हे केवळ भारतीय उपखंडातील हिंदूंमध्येच नव्हे तर आग्नेय आशियातील बौद्ध आणि हिंदूंमध्ये देखील सर्वात लोकप्रिय आहे.
एकूण हा दिवस म्हणजे नवीन संवत्सराचा पहिला दिवस.
“अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥”
– श्री ज्ञानेश्वरी
आरंभ होई चैत्रमासीचा गुढय़ा-तोरणे सण उत्साहाचा.
गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा
- कवियत्री बहिणाबाई चौधरी
आज भारतीय नववर्ष प्रारंभ.
प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा… 🙏🌹
पूर्ण करेंगे हम सब केशव ! वह साधना तुम्हारी !!
पूर्ण करेंगे हम सब केशव ! वह साधना तुम्हारी!!
आत्म हवन से राष्ट्र्देव की आराधना तुम्हारी
निशि दिन तेरी ध्येय – चिंतना
आकुल मन की तीव्र वेदना
साक्षात्कार ध्येय का हो
यह मन कामना तुम्हारी
पूर्ण करेंगे………………………………………………।…१
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म – चैत्र शुद्ध प्रतिपदेला ( १ एप्रिल , १८८९ ) महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश च्या मधल्या बोधाण तालुक्यातील कुंदाक्रुती गावात झाला.
१९२५ पासून सुरू झालेला हा प्रवास केवळ देशातच नव्हे तर विदेशातही अगणित संघ समर्पित कार्यकर्त्यांच्या बळावर भक्कम पणे कार्य विस्तार करत आहे.
राष्ट्राचे संरक्षण आणि प्रगती या दोन्हीचा विचार करणारी नित्य सिद्ध चारित्र्यवान शक्ती निर्माण करण्यासाठी डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. विस्मृतीत गेलेली हिंदू ही आपली खरी ओळख पुन्हा जागृत करण्याचे कार्य संघाने गेल्या १०० वर्षांत सातत्याने केले.
फाळणीच्या काळात स्वयंसेवकांनी लाखो हिंदूंचे प्राण वाचवले, तर आणीबाणीविरुद्ध लढा देऊन देशाची लोकशाही टिकवून ठेवली.
लातूरचा भूकंप असो वा कोव्हिड काळ, स्वयंसेवक नेहमीच मदतीला धावून जातात.
आजच्या काळात लहान कुटुंबे, नैराश्य आणि लोकसंख्येचे असंतुलन यांसारख्या प्रश्नांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने या राष्ट्रकार्यात सहभागी व्हायला हवे.
• १८८९ : रा.स्व. संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म दिवस. ( मृत्यू : २१ जून,१९४० )
• १९४० : ॥ शके अठराशें एकसष्टांत । प्रमाथिनाम संवत्सरांत । चैत्रमासीं शुद्धांत । वर्षप्रतिपदेला ॥५१॥ हा ग्रंथ कळसा गेला । शेगांव-ग्रामीं भला । तो गजाननांनीं पूर्ण केला । प्रथम प्रहरीं बुधवारीं ॥५२॥
• शके १८६१ (बुधवार, २२ मार्च १९३९ ) वर्षप्रतिपदेला संत कवी श्री दासगणू महाराज यांनी संत श्रेष्ठ शेगाव निवासी श्री गजानन महाराज यांच्यावरील २१ अध्यायांचा ‘ श्री गजानन विजय ‘ ग्रंथ लेखन पूर्ण करून श्रींचे चरणी अर्पण केला.
आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे – अंतरिक्षातील चमत्कारिक वाटणाऱ्या घटना व लोहचुंबक यांचे अनुभव घेण्यासाठी आर्लिबार यांनी १८४० साली मुंबईत कुलाबा येथे एक वेधशाळा सुरू केली. तेथे त्यांनी केरुनानांना ‘सहाय्यक’च्या जागी नेमले. अवघ्या सोळाव्या वर्षी दरमहा ५० रुपये पगारावर लागलेल्या या नोकरीत केरूनानांनी पुढील दहा वर्षे जागरूकपणे हवामानशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यामुळेच पुढील आयुष्यात कोणतेही शास्त्रीय तत्त्व प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध झाल्याशिवाय किंवा त्याच्या सत्यतेचा पडताळा घेतल्याशिवाय ते स्वीकारीत नसत.
स्वभाषेत शास्त्रीय विषय सुलभपणे मांडून ज्ञानप्रसार करण्यासाठी १८४८ साली मुंबईत स्थापन झालेल्या ‘ज्ञानप्रसारक सभे’पुढे केरुनानांनी हवा, भरती-ओहोटी, कालज्ञान या विषयांवर निबंध वाचले. ‘हवे’वर तर एकूण १७ निबंध असून त्यांत आकृत्यांसह सृष्टीतील अनेक चमत्कारांचे चित्तवेधक वर्णन केलेले आहे.
मुख्य म्हणजे अशा शास्त्रीय लेखनात परिभाषेसाठी केरुनानांची लेखणी कधी अडली नाही. उदाहरणार्थ, संवर्धन, स्नेहाकर्षण, केषाकर्षण, त्वरा, भरतीची समा, वातादिक दर्शक यंत्र, इत्यादी समर्पक, सुटसुटीत व अर्थवाही शब्द त्यांनी जागोजागी योजलेले आहेत.
जन्मतिथीवरून इंग्रजी तारीख वा तारखेवरून तिथी काढण्यासाठी ‘कालसाधनांची कोष्टके’, तर पंचांग तयार करण्यासाठी ‘ग्रहसाधनांची कोष्टके’, हे ग्रंथ त्यांनी लिहिले. मात्र ते लिहिताना आपल्याकडील ज्योतिष परिस्थितीस बाधा येणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. या ग्रंथावरून भारतीय युद्धाच्या वेळची ग्रहस्थिती व महाभारतात त्याच्याशी तंतोतंत जुळणारे वर्णन, याचा पडताळा एका अभ्यासकाने घेतला होता. श्रीक्षेत्र काशीतील भूस्थिरवाद्यांना उत्तर देण्यासाठी त्यांनी ‘कुभ्रम निर्णय’ पुस्तक लिहिले, तर ‘पृथ्वीवर पडणारा पाऊस व सूर्यावरील डाग’ यांवर केरुनानांनी सार्वजनिक सभेत निबंध वाचला होता.
केरुनानांचा ऐन उमेदीचा काळ वेधशाळेत सूक्ष्मयंत्रांच्या सहवासात गेल्याने, पंचांगातील गणितातून ऋतुकाळ व आकाशस्थ ग्रहांचा दृकप्रत्यय येण्याबद्दल ते आग्रही होते. शिवाय धर्मकृत्य करण्यासाठी पंचांगात दाखवलेल्या वेळा निर्दोष असाव्यात म्हणून त्यांनी बडोद्याच्या आबासाहेब पटवर्धनांच्या मदतीने शुद्ध पटवर्धनी पंचांग काढले.
केरूनाना प्रागतिक विचारसरणीचे होते. ते मुलींच्या शाळेच्या व्यवस्थापक मंडळावर होते व स्रियांच्या सामाजिक सुधारणांस त्यांचा पाठिंबा होता, श्रीमती रमाबाई रानडे यांच्या प्रेरणेने भरणाऱ्या स्रियांच्या साप्ताहिक सभेस नियमित हजर राहून ते स्त्रियांचे शिक्षण करीत असत. ते स्रियांना गृहजीवनोपयोगी शिक्षण द्यावे, अशा मताचे होते.
शास्त्रीय विषयांत रमणाऱ्या केरुनानांचे व्यक्तिमत्त्व एकसुरी नव्हते, हे त्यांना असलेल्या शास्त्रीय संगीत व नाटकांची आवड यांवरून दिसून येते. इतकेच नव्हे, तर किर्लोस्कर मंडळींच्या नाटकांच्या तालमींना हजर राहून गायक नटांना, नाटकात गाण्याचा अतिरेक न करण्याचा ते सल्ला देत असत. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊन कै. अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपले ‘सौभद्र’ नाटक त्यांना अर्पण केलेले आढळते.
• १८८४: आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचे निधन. (जन्म: १६ मे १८२५)
‘प्रीतीचं झुळझुळं पाणी’, ‘मी कशाला आरशात पाहू गं’, ‘अरे ले लो भाई चिवडा लो’ आणि ‘हे गर्द निळे मेघ, बिलगून जशी वीज’ ही
लोकप्रिय गीत लिहिणारे ज्येष्ठ कवी, गीतकार डॉ. मुरलीधर गोडे यांची चारही गाणी त्याकाळी प्रचंड गाजली होती. त्यांनी एकूण १४ चित्रपटांसाठी गीतलेखन केलं. अनेक टीव्ही मालिकांसाठीही त्यांनी शिर्षक गीते लिहिली.
• २०२० : अवीट गोडीच्या गाण्यांनी रसिकांवर अधिराज्य गाजविणारे कवी, गीतकार डॉ. मुरलीधर गोडे निधन. ( जन्म : १८ जून १९३७ )
- घटना :
१६७४: शिवाजी महाराजांच्या सर्वात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे निधन.
१८४८: लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले.
१९३२: सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला.
२००१: वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्शने दक्षिण अफ्रिकेच्या जॅक्स कॅलिसला पायचीत करुन कसोटी सामन्यातील पाचशेवा बळी मिळविला. कसोटी सामन्यांत ५०० बळी मिळवणारा तो पहिला गोलंदाज बनला.
२००३: अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकविरुद्ध युद्ध पुकारले.
• मृत्यू :
• १९७८: भारतीय वकील आणि राजकारणी एम. ए. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी, १८९१)
• १९८२: स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी जीवटराम भगवानदास तथा आचार्य कॄपलानी यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर, १८८८)
• १९९८: केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद यांचे निधन. (जन्म: १३ जून , १९०९)
• २००२: यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट, १९३१)
जन्म :
• १८९७: चित्रपट संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म. (मृत्यू : २७ जानेवारी, १९७६)
१९२३ : बहुगुणी नायिका आणि गायिका शांता आपटे यांचा जन्म ( मृत्यू : २४ फेब्रुवारी १९६४)
१९३८: बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांचा जन्म.






