या वेळचा गुढीपाडवा विशेष

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज बुधवार, मार्च २२, २०२३ रोजीचे

पंचांग आणि दिनविशेष

युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर चैत्र ०१, शके १९४५
सूर्योदय : ०६:४१ सूर्यास्त : १८:५०
चंद्रोदय : ०७:०६ चंद्रास्त : १९:३६
शक सम्वत : १९४५
संवत्सर : शोभन
उत्तरायण
ऋतू : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : प्रतिपदा – २०:२० पर्यंत
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा – १५:३२ पर्यंत
योग : शुक्ल – ०९:१८ पर्यंत
क्षय योग : ब्रह्म – ०६:१६, मार्च २३ पर्यंत
करण : किंस्तुघ्न – ०९:३३ पर्यंत
द्वितीय करण : बव – २०:२० पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : मीन
राहुकाल : १२:४६ ते १४:१७
गुलिक काल : ११:१४ ते १२:४६
यमगण्ड : ०८:१२ ते ०९:४३
अभिजितमुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:२१ ते १३:१०
अमृत काल : ११:०७ ते १२:३५
वर्ज्य : ०२:५०, मार्च २३ ते ०४:२१, मार्च २३

। नूतन वर्षारंभस्य शुभचिंतनम् ।
आज शोभन संवत्सर, उत्तरायण, वसन्त ऋतू, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा. म्हणजे गुढीपाडवा. (दिनांक २२.३.२०२३) काही राज्यांमध्ये या गुढीपाडव्याला युगादी, युगाचा प्रारंभ असे म्हणतात. तर काही ठिकाणी उगादी असे म्हणतात. एकूण हा दिवस म्हणजे नवीन संवत्सराचा पहिला दिवस.

“अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥”

  • श्री ज्ञानेश्वरी
  • आरंभ होई चैत्रमासीचा गुढय़ा-तोरणे सण उत्साहाचा

गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा

  • कवियत्री बहिणाबाई चौधरी

आज हिंदू नववर्ष प्रारंभ

प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष! आपल्या जीवनात नांदावे, सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!! गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा…

पूर्ण करेंगे हम सब केशव ! वह साधना तुम्हारी !!
पूर्ण करेंगे हम सब केशव ! वह साधना तुम्हारी!!
आत्म हवन से राष्ट्र्‌देव की आराधना तुम्हारी
निशि दिन तेरी ध्येय – चिंतना
आकुल मन की तीव्र वेदना
साक्षात्कार ध्येय का हो
यह मन कामना तुम्हारी
पूर्ण करेंगे।

संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म- चैत्र शुद्ध प्रतिपदेला ( १ एप्रिल , १८८९ ) महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश च्या मधल्या बोधाण तालुक्यातील कुंदाक्रुती गावात झाला.
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना केवळ देशातच नव्हे तर विदेशातही अगणित संघ समर्पित कार्यकर्त्यांच्या बळावर भक्कम पणे कार्य विस्तार करत आहे.
*१८८९ : रा.स्व. संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म दिवस. *

१९४० : ॥ शके अठराशें एकसष्टांत । प्रमाथिनाम संवत्सरांत । चैत्रमासीं शुद्धांत । वर्षप्रतिपदेला ॥५१॥ हा ग्रंथ कळसा गेला । शेगांव-ग्रामीं भला । तो गजाननांनीं पूर्ण केला । प्रथम प्रहरीं बुधवारीं ॥५२॥
शके १८६१ (बुधवार, २२ मार्च १९३९ ) वर्षप्रतिपदेला संत कवी श्री दासगणू महाराज यांनी संत श्रेष्ठ शेगाव निवासी श्री गजानन महाराज यांच्यावरील २१ अध्यायांचा ‘ श्री गजानन विजय ‘ ग्रंथ लेखन पूर्ण करून श्रींचे चरणी अर्पण केला.

जागतिक जल दिन’– हा एक आंतरराष्टीय दिवस आहे.प्रतिवर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे. प्रतिवर्षी संयुक्त राष्टाचे सदस्य असलेल्या देशांकडून हा दिवस साजरा केला जातो.त्यासाठी प्रतिवर्षी एक नवी संकल्पना मांडली जाते.त्या संकल्पनेला अनुसरून वर्षभर उपक्रम राबवले जातात.उदा.पाणी आणि ऊर्जा,पाणी आणि शाश्वत विकास इ.

आज जागतिक मुकाभिनय दिन आहे.

आज पाणी दिवस (जागतिक पेय जल दिवस) आहे

घटना :
१७३९: नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.
१९३३: डकाऊ छळछावणीची सुरुवात झाली.
१९४५: अरब लीगची स्थापना झाली.
१९४९ : माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच एसएससी परीक्षा पद्धतीची सुरूवात झाली.
१९७०: हमीद दलवाई यांनी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
२०२० : भारतात करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना ‘जनता कर्फ्यु’चं आवाहन केले. त्या दिवशी सर्व व्यवहार बंद होते.

*• मृत्यू : *
• १९८४: लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचे निधन.
• २००४: कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १९०९)

जन्म :
१९२४: नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९८५)
१९४२: भारतीय न्यायशास्त्रज्ञ, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कायदा आयोगाचे अध्यक्ष अरुणाचलम लक्ष्मणन यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट २०२०)

\\\\

या वेळचा गुढीपाडवा विशेष आहे.

या चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच भारतीय सौर दिनदर्शिकेचा “१ चैत्र” हा दिनांक येत आहे. त्यामुळे दोन्ही दिनदर्शिकांमध्ये शकवर्ष १९४५ हे एकाच दिवशी सुरू होत आहे. असा योग सर्वसाधारणपणे दर एकोणीस वर्षांनी येतो.

आपलं सर्वसामान्य पंचांग चांद्र-सौर असं मिश्र स्वरूपाचं आहे. त्यामुळे सूर्य आणि चंद्र या दोघांच्या गतीप्रमाणे आणि अधिकमास/क्षयमास गृहीत धरून चांद्र तिथी आणि सौर दिनांक हे पुढेमागे येत असतात.

१९५७ सालापासून प्रमाणित करण्यात आलेल्या भारतीय सौर दिनदर्शिकेतील नव्या शकवर्षाचा प्रारंभ २२ मार्च या दिवशी म्हणजे मध्यममानाने वसंतसंपाताच्या दुसऱ्या दिवशी होतो. लीप इसवी वर्षामध्ये हा नव्या शकवर्षाचा प्रारंभ २१ मार्च या दिवशी होतो. त्या वर्षात सौर चैत्र महिन्याचे दिवस ३० ऐवजी ३१ असतात.

२२ मार्च या एकाच दिवशी सर्वसामान्य पंचांग आणि भारतीय सौर दिनदर्शिकेच्या नव्या वर्षांचा प्रारंभ यापूर्वी १९८५ साली (शकवर्ष १९०७ मध्ये) झाला होता. तो या वर्षी म्हणजे २०२३ साली (शकवर्ष १९४५ मध्ये) होत आहे. यापुढच्या काळात २०४२ साली (शकवर्ष १९६४ मध्ये) आणि २०६१ साली (शकवर्ष १९८३ मध्ये) तो तसा होईल.

यापूर्वी इ.स. २००४ (शकवर्ष १९२६) आणि यापुढे इ.स. २०८० (शकवर्ष २००२) या दोन्ही लीप वर्षांमधली चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि सौर चैत्र १ यांचा संयुक्त दिनांक २१ मार्च हा होता/असेल.

कालगणनेचं निरीक्षण करताना सहज दिसून आलेली ही बाब आपल्यापुढे मांडलेली आहे.

आपणा सर्वांना नववर्षतिथी, नववर्षदिन आणि नव्या १९४५ या शकवर्षाकरिता हार्दिक शुभेच्छा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »