हार्वेस्टरने ऊस तोडणी..!

पुणे ः गेल्या २० दिवसांपासून राज्यभरात यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. यासाठी लागणाऱ्या उसाची तोड जोरात सुरू आहे. काही ठिकाणी मजूर उसतोड करताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी अत्याधुनिक हार्वेस्टरसारख्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तोड होताना दिसत आहे. शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील करंदी परिसरात हार्वेस्टरच्या साह्याने ऊस तोडणी करतानाचे नुकतेच टिपलेले छायाचित्र मात्र शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.






