ऊसतोडणी मशिनमालक आक्रमक; अन्यथा मंत्रालयाला घेराव घालणार!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणेः महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी मशिनमालक संघटने आपल्या विविध प्रमुख मागण्यांसाठी साखर आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. संबधित मागण्या पूर्ण नाही झाल्या तर राज्यातील तेराशे मशिनमालक मशिनसह साखर संकुल आणि मंत्रालयाला १० एप्रिलपासून घेराव घालतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनापूर्वी गेल्या बुधवारी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते.

संघटनेचे सचिव अमोलराजे जाधव म्हणाले, “गेल्या पाच वर्षांपासून आमच्या मागणीसाठी लढा देत आहोत. परंतु सरकार केवळ आश्वासनच देत आहे. यावेळेस जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलनाचे स्वरूप उम्र करणार आहोत. आंदोलनात महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे सचिव अमोलराजे जाधव, संजय साळुंके, सागर पाटील, गणेश यादव, जगन्नाथ सपकाळ, अभय कोल्हे, धनंजय काळे, जयदीप पाटील, तुषार पवार यांच्यासह राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मशिन मालक सहभागी झाले होते.

काय आहेत मागण्या?

■ ऊसतोडणी मशिनचा तोडणीदर ५० टक्क्यांनी वाढवून द्यावा

■ बँकेचे हप्ते आहेत त्या परिस्थितीत तीन वर्षे मुदतवाढ मिळावी

■ पाचट कपात १.५ टक्का असावी

■ मशिनचे तोडणीदर, वाहतूकदर वाढविण्यात यावेत

■ २०१९ पासून जवळपास ९०० मशिनला अनुदान मिळालेले नाही, ते अनुदान देण्यात यावे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »