भारतीय नौसेना दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज बुधवार, डिसेंबर ४, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण १३, शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:५८ सूर्यास्त : १८:००
चंद्रोदय : ०९:४१ चंद्रास्त : २०:४६
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : हेमंत
चंद्र माह : मार्गशीर्ष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : तृतीया – १३:१० पर्यंत
नक्षत्र : पूर्वाषाढा – १७:१५ पर्यंत
योग : गण्ड – १३:५७ पर्यंत
करण : गर – १३:१० पर्यंत
द्वितीय करण : वणिज – ०१:०२, डिसेंबर ०५ पर्यंत
सूर्य राशि : वृश्चिक
चंद्र राशि : धनु – २३:२० पर्यंत
राहुकाल : १२:२९ ते १३:५२
गुलिक काल : ११:०६ ते १२:२९
यमगण्ड : ०८:२० ते ०९:४३
अभिजितमुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:०७ ते १२:५१
अमृत काल : १२:२० ते १३:५८
वर्ज्य : ०१:१९, डिसेंबर ०५ ते ०२:५५, डिसेंबर ०५

१९१०: भारताचे माजी राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी २००९)

१९१९: भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचा जन्म. (मृत्यु : ३० नोव्हेंबर, १९१२)

मराठा साम्राज्याचा विस्तार संपूर्ण हिंदुस्थानात वाढत होता. आणि अशा वेळेस सागरी किनारा आणि समुद्राच असणार महत्व शिवाजी महाराजांनी ओळखल आणि उदय झाला भारतातील पहिल्या आरमाराचा (नेव्ही).आपण जर भारताचा इतिहास बघितला तर शिवाजी महाराज्यांच्या आधी कोणीही समुद्र किणाऱ्यांची सुरक्षा करण्यासाठी समुद्र सैनकांची तुकड़ी (नेव्ही ) निर्माण केली नाही, आणि म्हणूनच शिवाजी महाराजाना फादर ऑफ़ इंडियन नेव्ही ” म्हणतात.

१९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरूवात झाली. इ.स. १९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते.

भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौकांच्या तोफा आहे. नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत. २०० मरीन कमांडों नौदलात आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा आणि मिसाईलचा मारा करणारी नौका विनाश या नौका तसेच संकुश पाणबुडी हे सुद्धा नौदलाचे भाग आहेत.

१९५३ मध्ये हवेत मारा करणारी शस्त्रे आणि इ.स. १९६७ मध्ये पाणबुडय़ा ताफ्यात समाविष्ट झाल्या.

युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशातच हवी या अनुषंगाने माझगाव गोदी मध्ये इ.स. १९६६ वर्षी लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम सुरू झाले. या माध्यमातून आजतागायत ८० युद्धनौकांची बांधणी करण्यात आली आहे. त्यात टेहळणी जहाजांपासून विनाशिकेपर्यंत आणि लढाऊ जहाजे, पाणबुडी यांच्यासह युद्धनौकांचाही समावेश आहे.

भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत ही सामील आहे. अण्वस्त्र आव्हानाला तोंड देण्याची क्षमता असलेल्या या आयएनएस अरिहंतची निमिर्ती कलपक्कम येथील ‘इंदिरा गांधी सेंटर फॉर अँटोमिक रिसर्च’ येथे ‘भारतीय नौदल’ आणि ‘संरक्षण संशाधक आणि विकास ऑर्गनायझेशन’ने एकत्रित प्रयत्नांतून करण्यात आली आहे.

आज भारतीय नौसेना दिन आहे.

तात्या उर्फ तंट्या भिल्ल – भारतीय स्वातंत्र लढ्याच्या इतिहासाप्रमाणे या आदिवासी भिल्ल क्रांतिकारकांचा इतिहास ही महत्वाचा आहे जो बाकीच्या क्रांतिकारकांच्या प्रमाणे सगळ्यांच्या पुढे आला नाही. बलाढ्य ब्रिटिश सत्तेला सतत अकरा वर्ष सळो कि पळो करणारे हे क्रांतिकारक दुर्लक्षितच राहिले. व त्यांना ब्रिटिश सत्तेने कायम दरोडेखोर याच दृष्टिकोनातून बघितले.

वरील उल्लेख केलेले जे क्रांतिकारक आहेत त्यातील एक विलक्षण क्रांतिकारक म्हणजे तंट्या उर्फ तात्या भिल्ल होय. याला ब्रिटिश सरकार कायमच दरोडेखोर म्हणून बघत आले. ब्रिटिशाना सतत ११ वर्ष हुलकावणी देणारा हा क्रांतिवीर १५० वर्षांपूर्वी आदिवासी व शेतकऱ्यांना, सावकार, मालगुजार आणि जुलमी सरकार विरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा देणार तंट्या हा आदिवासी – शेतकऱ्यांच्या क्रांतीच पहिला नायक होय. त्याने सातपुड्याच्या दोन्ही भागात – खानदेश व नर्मदा खोऱ्यातील आदिवासी शेतकऱ्यांत राष्ट्रीयत्वाची भावना जागवली. ज्या काळात पुण्यात महात्मा जोतीराव फुले समाज सुधारणेसाठी कार्यरत होते त्याच काळी हा भिल्ल नायक आदिवासी, किसान ह्यांच्या पारतंत्र्याच्या बेड्या झुगारून देण्यासाठी एकाकी लढा देत होता.

हा तंट्या भिल्ल अत्यंत साधा भोळा होता त्याची वडिलोपार्जित जमीन कर्जापोटी पाटलाने बळकावली. कर्ज फेडू इच्छिणाऱ्या तंट्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले शिक्षा भोगून आल्यावर तंट्या भिल्ल मोलमजुरी करू लागला पुन्हा गावकर्यांनी पाटलाच्या मुलीच्या प्रेमसंबंधाचा आरोप ठेऊन हुसकावून लावलं व पुन्हा खोटे आरोप ठेऊन जेल मध्ये डांबले.
माणूस म्हणून शांत जीवन जगण्याची धडपड करणाऱ्या तंट्याला जमीन हडप करणारे पाटील-मालगुजार त्यांना साथ देणारे सावकार पोलीस व सर्वच शासन यंत्रणेने जगणे असाह्य केले. अन्यायाने पिचून गेलेला तंट्या बदलत गेला. आपल्या व्यवस्थेशी आणि बलाढ्य ब्रिटिश राजसत्तेशी लढा सुरु केला.
जगणे असाह्य झाल्याने तंट्या मालगुजार – सावकारांना लुटू लागला. पोलीस चौक्यांवर हल्ला करू लागला. सत्ताधाऱ्यांना डाकू दरोडेखोर वाटणारा तंट्या हा डाकू नव्हताच. सावकार – मालगुजरांना लुटून तो गरिबांना वाटून टाकी. दुष्काळात सावकारांची आणि सरकारी धान्याची गोदाम फोडून गरिबांना मोफत धान्य वाटू लागला. गरजूना बिनव्याजी कर्ज देवू लागला. स्त्रियांना तो पाठीराखा वाटत होता.
गरिबांचा वाली, त्यांचा रक्षणकर्ता, जंगलाचा सार्वभौम राजा अशी त्याची प्रतिमा जनमानसात बनली होती. त्याच्या जिवंतपणीच खानदेश – नर्मदा खोऱ्यात तो एक दंतकथा बनला होता.

त्या काळी त्याच्या कथा व गीते घराघरात पोहोचली होती. तंट्याला पकडण्यासाठी १०,५०० रुपये आणि पंचवीसशे एकर जमिनीचे बक्षीस ब्रिटिशांनी देऊ केले होते व त्याच बरोबर होळकरांनी सुद्धा वेगळे बक्षीस ठेवले होते. याच्या वरूनच तंट्या भिल्लाने किती त्रास ब्रिटिश सत्तेला दिला होता हे लक्षात येते. त्याच बरोबर ब्रिटिशांनी तंट्याला पकडण्यासाठी ‘तंट्या पोलीस’ नावाचे स्वतंत्र पोलीस दल स्थापन केले. गावागावात तंबु उभे करून पोलीस चौक्या उभ्या केल्या होत्या. मालगुजार व सावकारांना मोफत शास्त्रे वाटली होती तरीही हा वीर ११ वर्ष पोलिसांच्या हातांवर तुरी देवून डोंगरदऱ्यात तळपत होता.

तंट्याचे जीवन मानवतेचे संदेश देणारे होते. त्याच्यात नेतृत्वाचे सगळे गुण होते. तो निस्वार्थी होता. स्वतःसाठी त्याने काही ठेवले नाही. त्याची प्रचंड बुद्धिमत्ता, चपळाई, प्रसंगावधान, दयाळूपणा, सभ्यपणा, न्यायीदृष्टी, उदार दृष्टिकोन या गुणांबद्दलच्या लोककथा – लोकगीते गावोगावी पसरली होती. हे सारे ब्रिटिश तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्रव्यवहारात अहवालात नमूद करून ठेवले आहॆ.
ब्रिटिश राजसत्तेच्या काळात निजाम, होळकर, शिंदे व इतर संस्थानिक ब्रिटिश सत्ते बरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते त्या काळात हा लोकविलक्षण नायक जनाधारावर झुंजत होता.

११ वर्ष ब्रिटिश सत्तेच्या तोंडचे पाणी तंट्याने पळविले. ज्या काळात पुण्यात महात्मा जोतीराव फुले समाज सुधारणेसाठी कार्यरत होते त्याच काळात हा भिल्ल नायक आदिवासी-किसान ह्यांच्या पारतंत्र्याच्या बेड्या झुगारून देण्याचा एकाकी लढा देत होता .

हा जननायक तात्या भिल्ल, तंट्या भिल्ल तसेच तंट्या भिल्ल मामा व रॉबिन हूड ऑफ इंडिया या नावाने ओळखत होते. हा जननायक फंद फितुरी मुळेच इंग्रजांच्या हाती लागला व इंग्रजांनी ४ डिसेम्बर १८८९ ला या जननायकाला फाशी दिली. त्याचे पार्थिव पाताळपाणी (मध्यप्रदेश) या ठिकाणी रेल्वे ट्रॅक च्या कडेला फेकून दिले. ज्या ठिकाणी या जाननायकाचे पार्थिव सापडले तिथे त्याचे मंदिर हि उभारले आहे व आज सुद्धा या ठिकाणी येथून जाणाऱ्या रेल्वे गाड्या या मंदिराच्या समोर मानवंदना देण्यासाठी काही सेकंद थांबतात.

दुर्दैवाने इतिहासात तंट्याची नोंद एक डाकू व दरोडेखोर अशीच झाली आहे. इतिहास लिहिणाऱ्यांनी गुन्हेगार जातीत जन्मलेल्या तंट्या भिल्लवर हा अन्याय केला. महाराष्ट्रातील लोककथा, लोकनाट्य, पोवाडे आणि लोकगीतातही तंट्या लोकांसमोर येत होता तेही एक डाकू आणि दरोडेखोर हा कपाळावर डाग घेऊनच. एक दशकभर हा क्रांतिवीर बेदखल राहिला त्याची हि एकाकी झुंज आदिवासी स्वातंत्रलढयातील एक सोनेरी पान आहे.

१८८९ : जननायक तंट्या भिल्ल यांचा बलिदान दिन .

भारतीय शास्त्रज्ञ कृष्णन, सर कार्यमाणिक्कम श्रीनिवास – रामन परिणाम व चुंबकत्व आणि स्फटिकांचे चुंबकीय व प्रकाशीय गुणधर्म यांसंबंधी महत्त्वाचे संशोधन कार्य त्यांनी केले. त्यांचा जन्म तमिळनाडूमधील वत्रप येथे झाला. शिक्षण तिरुपती, श्रीरंगम् व मद्रास येथे झाले. मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजात काही काळ अध्यापन केल्यानंतर प्रख्यात शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांचे साहाय्यक म्हणून कृष्णन यांची नेमणूक झाली (१९२३–२८). पुढे १९२९–३३ या काळात डाक्का विद्यापीठात भौतिकीच्या प्रपाठकपदावर काम केल्यानंतर कलकत्ता येथील इंडियन ॲसोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेत त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.
त्यानंतर १९४२ मध्ये अलाहाबाद विद्यापीठात भौतिकीच्या प्राध्यापकापदावर व १९४७ मध्ये दिल्लीच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीच्या संचालकपदावर त्यांची नेमणूक झाली.

रामन यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णन यांनी प्रकाशकी व रेणवीय भौतिकी या शाखांत संशोधन केले. ‘रामन परिणाम’या रामन यांच्या सुप्रसिद्ध शोधाच्या संशोधनामध्ये कृष्णन यांनी फार बहुमोल सहकार्य केले. रेणूंमधील चुंबकीय ग्रहणक्षमता व चुंबकीय विषयमदिक्ता (निरनिराळ्या अक्षांच्या दिशांत वेगवेगळे गुणधर्म असणे) यांच्या सूक्ष्म मापनासाठी त्यांनी कित्येक उपकरणे व यांत्रिक योजना तयार केल्या व त्यांच्या आधाराने प्रतिचुंबकीय (निर्वातापेक्षा चुंबकीय पार्यता कमी असलेल्या) आणि समचुंबकीय (निर्वातापेक्षा चुंबकीय पार्यता जास्त असलेल्या) स्फटिकरूप द्रव्यांच्या विषमदिक्तेसंबंधी महत्त्वाची निरीक्षणे नोंदली, या त्यांच्या कार्यामुळे स्फटिकरूप पदार्थांच्या आंतररचनेचा अभ्यास करण्यासाठी क्ष-किरण, पद्धतीव्यतिरिक्त एक नवीन पद्धती उपलब्ध झाली. या त्यांच्या संशोधनाची माहिती इंग्लंडच्या रॉयल सोसायटीच्या नियतकालिकात तसेच अमेरिकेतील फिजिकल रिव्ह्यूमध्ये प्रसिद्ध होऊन कृष्णन यांना जागतिक कीर्ती प्राप्त झाली.

त्यांच्या संशोधनाच्या गौरवार्थ त्यांना कॅव्हेंडिश प्रयोगशाळा, रॉयल इन्स्टिट्यूशन व स्ट्रॅसबर्ग येथील जागतिक चुंबकत्व परिसंवादात (१९३९) व्याख्याने देण्यासाठी पाचारण करण्यात आले. १९४० साली रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. १९४६ मध्ये त्यांना सर हा किताब देण्यात आला. त्यानंतर अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्यत्व (१९५६), भारताच्या नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य, भारत सरकारचा पद्मभूषण किताब (१९५३) व भटनागर पारितोषिक (१९६१) हे बहुमान त्यांना मिळाले. १९४० साली ते इंडियन सायन्स काँग्रेसच्या भौतिकी विभागाचे प्रमुख व १९५३ मध्ये अलाहाबाद येथे भरलेल्या सायन्स काँग्रेसच्या परिषदेचे अध्यक्ष होते.

दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.

१८९८ : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भौतिक शास्त्रज्ञ कार्यमाणिवकम् श्रीनिवास कृष्णन् यांचा जन्म ( मृत्यू : १३ डिसेंबर, १९६१ )

  • घटना :
    १७९१: द ऑब्जर्व्हर हे जगातील पहिले रविवार वृत्तपत्र प्रकाशित झाले.
    १८२९: भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंगने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला. तसेच सतीप्रथा बंद केली.
    १८८१: लॉस ऍन्जेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.
    १९२४: गेट वे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.
    १९६७: थुंबा येथील तळावरुन रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण.
    १९४८: भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली.
    १९७१: भारत पाकिस्तान तिसरे युद्ध-ऑपरेशन ट्रायडेंट भारतीय आरमाराने कराची वर हल्ला केला.
    १९७५: सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
    १९९१: पॅन अॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.

• मृत्यू :

• १९७३: कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर, १८९३)
१९८१: मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या ख्यातनाम कलासंस्थेचे पहिले भारतीय डीन , मराठी चित्रकार जनार्दन दत्तात्रेय गोंधळेकर यांचे निधन. (जन्म : २१ एप्रिल, १९०९ )
• २०१४: भारतीय वकील आणि न्यायाधीश व्ही. आर. कृष्ण अय्यर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर, १९१५)
२०२१ : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं निधन (जन्म: ११ मार्च १९५४ )

  • जन्म :
    १८८८ : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वीर पत्नी यमुनाबाई सावरकर ( माई सावरकर ) (मृत्यू : ८ नोव्हेंबर, १९६३)
    १९१० : आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते मोतीलाल राजवंश ऊर्फ मोतीलाल यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून , १९६५)
    १९१६: पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, पंजाब विद्यापीठातील भारतीय रंगभूमी विभागाचे प्रमुख बळवंत गार्गी यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २००३ – मुंबई)
    १९३५: पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक शंकर काशिनाथ बोडस यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै, १९९५)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »