इंडियन शुगरचा पहिला हप्ता रू. २६०१

इंडियन शुगर (श्री दत्त इंडिया ) लि. हवीनाळ या कारखान्याचा गळीत हंगाम सन २०२३-२४ चा शुभारंभ दि. ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आला, यावेळी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. मृत्युंजय शिंदे यांनी चालू वर्षी गळीत हंगामात येणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता प्रति टन 2601/- रुपये व अर्धा किलो साखर देणार असल्याचे जाहीर केले.
कारखान्यातील कामगारांना दिवाळी सणासाठी 20 टक्के बोनस व दहा किलो साखर देणार असल्याचेही जाहीर केले. तसेच सर्व शेतकऱ्यांना आपला ऊस गळितास पाठवण्याचे आवाहन केले आहे.