श्रीनाथ साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून सुरक्षेची शपथ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम

पुणे – ‘कार्य आमचे सुरक्षित आचरणाचे. ध्येय आहे शून्य अपघातचे’ अशी घोषणा करीत श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याच्या सर्व कर्मचार्‍यांनी सुरक्षेची शपथ घेतली आहे.

भारतामध्ये दरवर्षी 04 मार्च ते दि. 11 मार्च या कालावधीमध्ये औद्योगिक सुरक्षितता जपण्यासाठी “राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह” आयोजित केला जातो. या निमित्ताने श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यामध्येही विविध उपक्रम राबविण्यात आले. याकरिता कारखान्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपण काम करीत असलेल्या ठिकाणी कायम सुरक्षितता राखणेबाबत निश्चय व्यक्त केला. याकरिता दि. 4 मार्च 2025 रोजी सर्वांनी सामुहिक औद्योगिक सुरक्षितता शपथ घेतली.

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यामध्ये नेहमीच कर्मचारी हिताचे विविध उपक्रम हाती घेतले जातात. त्यामध्ये कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी कारखाना साईटवर डॉक्टर्सची नेमणूक, सुरक्षेसाठी साधने, आवश्यकतेनुसार वाहनांची उपलब्धता तसेच सुरक्षितता राखण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.

Industrial Safety Week at Shrinath Mhaskoba sugar

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने दिनांक 4 मार्च 2026 ते 10 मार्च 2026 या कालावधीमध्ये कारखाना साईटवर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त सुरक्षा विषयक माहिती, सुरक्षा साहित्याचे प्रदर्शन, सुरक्षा पोस्टर आदी उपक्रम रावबून सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सुरक्षा साहित्याचा वापर कसा करायचा? कामगारांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये मध्ये करावयाच्या उपाययोजना तसेच स्वत:चा व इतर कामगारांचा बचाव कशा पद्धतीने करावयाचा? याचे प्रात्यक्षिक दाखविले गेले.

यावेळी मेजर सुरेंद्र सिंग यांनी उपस्थित राहून सर्व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले. तसेच अपघात होण्याची विविध कारणे सांगून अपघात न होण्यासाठी घ्यावयाची काळजी / खबरदारी समजावून सांगितली. तसेच मॉकड्रिल करून आग लागल्यावर ती कशी विझविता येईल याचे विविध प्रकार संगितले. फायर फायटिंग सिस्टिमची जोडणी व वापर करणेबाबतचे तंत्रज्ञान समजावून दिले.

सुरक्षा सप्ताह निमित्त कारखाना कार्यस्थळी आग विझविण्याचे मॉकड्रिल करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीमध्ये करण्याची कृती समजविण्यात आली. विविध ठिकाणी सुरक्षा नियमांविषयी विषयी पोस्टर लावण्यात आलेले आहेत. सुरक्षा सप्ताहमध्ये दररोज एक उपक्रम घेण्यात येत आहे.

Industrial Safety Week at Shrinath Mhaskoba sugar

कारखान्यातील कर्मचार्‍यांनी सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत याबाबत कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक श्री.पांडुरंग आबाजी राऊत नेहमीच आग्रही असतात. कर्मचारी सुरक्षेसाठी आवश्यक सुरक्षा साधने कारखाना पुरवित आहे. ‘शून्य अपघात’ हे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचे आहे, असे त्यांनी सर्व कर्मचार्‍यांना सांगितले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डी. एम. रासकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, हा सुरक्षा सप्ताह आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केला जातो याकरिता प्रत्येक व्यक्तीने काम करताना विविध सुरक्षा साधनांचा वापर केला पाहिजे, तसेच मशीन वर काम करताना स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि प्रत्येक दिवस हा सुरक्षा दिवस म्हणून पाळला पाहिजे कारण तुम्ही तुमच्या कुटुंबास व कारखान्यास सुरक्षित हवे असतात.

यावेळी सेफ्टी ऑफिसर श्री. डी.बी. बेलेकर यांनी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व विशद करून सर्व उपस्थितांना सुरक्षिततेबाबतची प्रतिज्ञा दिली. कारखान्याचे सिक्युरिटी ऑफिसर श्री. एस.एच.पवार यांनी सुरक्षा जनजागृती, कार्यस्थळी सुरक्षितता आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले; तसेच लेबर ऑफिसर श्री. आर.बी. मापारे यांनी औद्योगिक सुरक्षा विषयक नियम कर्मचार्‍यांना समजावून संगितले.

यानिमित्त सर्व कर्मचार्‍यांनी शपथ घेऊन भविष्यात कारखान्यात काम करीत असताना एकही अपघात होणार नाही असा निश्चय केला व आवश्यक ती सर्व प्रकारची काळजी घेऊन व सुरक्षा साधनांचा वापर करून काम करण्याचे निश्चित केले.

या सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने कारखान्याचे जनरल मॅनेजर (टेक्निकल) श्री. आर.एन. यादव, चिफ इंजिनिअर श्री. एन. ए. भुजबळ, जनरल मॅनेजर (बाय प्रॉडक्ट) श्री. आर. एस. शेवाळे, एच.आर. मॅनेजर श्री. डी.व्ही. रणवरे, असि.जनरल मॅनेजर (प्रशासन) श्री. व्ही. डी. गायकवाड तसेच कारखान्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी सहभाग घेतला होता.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »