डॉ. यशवंत कुलकर्णी यांना ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ जाहीर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंतस परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांना दी शुगर टेक्नॉलॉजिस्टस्‌ असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) या नामांकित संस्थेचा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’ जाहीर झाला आहे.

एसटीएआय ही साखर उद्योग क्षेत्रात काम करणारी खूप जुनी संस्था आहे. या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. संस्थेचे कार्य भारतभर चालते, त्यामुळे तिच्या पुरस्कारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

डॉ. कुलकर्णी यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे साखर उद्योग क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या शिरपेचात या पुरस्काराच्या निमित्ताने आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ‘शुगरटुडे’च्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »