अन्यथा निर्धारित इथेनॉल पुरवठा अवघड : ISMA

आवडल्यास ही बातमी शेअर करा

प्रति लिटर ७० रुपये दर देण्याची मागणी

नवी दिल्ली: उसापासून बनवल्या जाणाऱ्या इथेनॉलचा दर 69.85 रूपये (सुमारे ७० रू.) प्रति लिटर करावा, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) ने केली आहे.


इथेनॉलपासून चांगला परतावा मिळणार नसेल, तर त्याच्या उत्पादनावर कोणी अधिक गुंतवणूक करणार नाही. पुरवठा वाढवायचा असेल, तर दरवाढीखेरीज पर्याय नाही, असे ‘इस्मा’ने केंद्री अन्न मंत्रालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

खरे तर उसाचा एफआरपी दर गेल्या हंगामावेळी 305 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला, तेव्हाच इथेनॉलची किंमत प्रति लिटर 69.85 रुपये प्रति लिटर करायला हवी होती. आगामी गळीत हंगामासाठी एफआरपीमध्ये आणखी दहा रुपयांची वाढ केल्याने, आता इथेनॉल दरवाढीला पर्यायच नाही, असेही निवदेनात म्हटले आहे.

इथेनॉलच्या किमतीत वाढ करणे आवश्यक आहे, कारण 2025 पर्यंत 20 टक्के मिश्रणाचे सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुरवठा वाढवण्याची गरज आहे आणि योग्य परतावा नसल्यास इथेनॉल उत्पादनावर कोणी खर्च करणार नाही. पेट्रोलमध्ये 20 टक्के मिश्रण साध्य करण्यासाठी सुमारे 1,200 कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता असेल. यापैकी 2022-23 मध्ये सुमारे 400 कोटी लिटर इथेनॉलचे करार झाले, असे निवेदनामध्ये म्हटले आहे.

“अतिरिक्त 800 कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्यासाठी 17,500 कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. एवढी प्रचंड गुंतवणूक करण्यास चांगल्या परताव्याखेरीज कोण धजावेल, असा सवालही ‘इस्मा’ने केला आहे.

इतर मागण्यांबरोबरच, ISMA ने पेट्रोलियम कंपन्यांनी जारी केलेल्या निविदा अटींमध्ये काही सुधारणा करण्याची आणि व्याज सवलत योजना सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »