जमशेदजी नसरवानजी टाटा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज शुक्रवार, दि. ३ मार्च २०२३ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन १२, शके १९४४
सूर्योदय : ०६:५७ सूर्यास्त : १८:४४
चंद्रोदय : १५:१८ चंद्रास्त : ०४:५९, मार्च ०४
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : एकादशी – ०९:११ पर्यंत
नक्षत्र : पुनर्वसु – १५:४३ पर्यंत
योग : सौभाग्य – १८:४५ पर्यंत
करण : विष्टि – ०९:११ पर्यंत
द्वितीय करण : बव – २२:२७ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : मिथुन – ०८:५८ पर्यंत
राहुकाल : ११:२२ ते १२:५१
गुलिक काल : ०८:२५ ते ०९:५४
यमगण्ड : १५:४८ ते १७:१६
अभिजित मुहूर्त : १२:२७ ते १३:१४
दुर्मुहूर्त : ०९:१८ ते १०:०५
दुर्मुहूर्त : १३:१४ ते १४:०१
अमृत काल : १३:०१ ते १४:४९
वर्ज्य : ००:४३, मार्च ०४ ते ०२:३१, मार्च ०४

आज जागतिक वन्यजीव दिवस आहे.

जमशेदजी नसरवानजी टाटा- पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.
त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना “भारतीय उद्योगाचे जनक” म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते. १८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला.

१८५७ सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला. १८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली.

१८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली.

त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचेया उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते.
नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले.
१८३९ : टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे, १९०४)

संगीतकार रवी- हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णमय कालखंडाचा विचार करताना तुम्ही संगीतकार रवी यांना कधीच टाळू शकत नाही.
१९५० ते १९७० अशी सलग वीस वर्षे हिंदी चित्रपटसंगीतक्षेत्रात कार्यरत राहूनही रवी यांचे नाव आघाडीच्या संगीतकारांत कधीच का घेतले जात नाही हे एक कोडंच आहे. खर तर याच काळात त्याच्या नावावर अनेक सुपरहिट चित्रपट व सुपरहिट गाणी नोंदली गेली आहेत.
वचन, पुनराह, चौदावीका चांद, घट, गृहस्थी, भराना, चिराग कहाँ रोशनी कहाँ, या कृष्णधवल चित्रपटापासून ते थेट दस लाख, ऑखे वक्त, हमराज, काजल, नीलकमल, खानदान, एक फूल दो माली, सगाई, शहनाई, अशा रंगीत जमान्यातील अनेक चित्रपट केवळ त्याच्या सुमधुर सुरेल संगीतावरच गाजले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
“चौदहवीका चांद हो या आफताब हो, न सर झुका के जियो, ओ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही, बाबुलकी दुवाए लेती जा, हुस्नवाले तेरा जबाब नही, चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये, गैरोपे करम अपनोपे सितम, तुम जिसपे नजर डालो उसका दिलका खुदा हाफिज, सौ बार जनम लेंगे सौ बार फनाह होंगे अशी एक ना दोन किती तरी असंख्य सुरेल, सुमधुर व सदाबहार गाणी त्यांच्या नावावर असूनही रवी कुणाच्याच खिसगणतीत नसावा याच नवल वाटते.
हेंमतकुमारकडे शागिर्दी करत असतानाच त्याच्यातील हुनर व प्रतिभेचे देणे व चिकाटी, मेहनती स्वभाव आणि संगीतावरील अभंग निष्ठा पाहून त्यांनी रवी यांना त्यांच्याकडे आलेले काही चित्रपट त्याच्याबाबतीत खात्री असल्यानेच संगीतदिग्दर्शनासाठी बहाल केले. संगीतकार रवीला १९६०-७० च्या दशकात चौदहवीका चांद, दो बदन, आंखे, हमराज इ.चित्रपटांसाठी फिल्मफेअरचे नॉमिनेशन मिळाले होते तर १९६१ मध्ये घराना आणि १९६५ मध्ये खानदान चित्रपटासाठी त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून फिल्मफेअर पुरस्काराचा तो मानकरी ठरला. याशिवाय १९८२ मध्ये त्याने संगीतबध्द केलेल्या निकाह चित्रपटातील ‘दिलके अरमान आंसूओमे बह गये’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार या चित्रपटाची नायिका व पार्श्वगायिका सलमा आगा हिला मिळाला होता.
१९८० नंतर संगीतकार रवी यांनी बॉलीवूडकडून टॉलीवूडकडे म्हणजे मल्याळम चित्रपटांकडे मोर्चा वळवला व तिथेही आपले स्थान अव्वल असल्याचे अनेक मल्याळम चित्रपटांना सुपरहिट संगीत देऊन सिध्द केले. मात्र दाक्षिणात्य चित्रपटांसाठी त्याचे बॉम्बे रवी हे नवे बारसे झाले. थोडक्यात संगीतकार रवीने आपली सेंकड इनिंग बॉम्बे रवी या नावाने मल्याळम चित्रसृष्टीत यशस्वी केली. दाक्षिणात्य चित्रपटांना त्याने बॉम्बे रवी या नावाने संगीत दिले. ज्याबददल त्याला त्याच्या सेकेड इनिंगमध्येही विविध पुरस्कारही मिळाले आहेत. खरा सिक्का कुठेही टाकला तरी तो खणखणीतच वाजतो हेच त्याला मिळालेले सेकंड इनिंगमधले पुरस्कार सांगतात.
१९२६ : संगीतकार रवि शंकर शर्मा उर्फ रवि यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च , २०१२)

घटना :
इ. स. ७८: शालिवाहन शकास प्रारंभ झाला.
१८८५: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.
१९२३: टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.
१९३०: नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.
१९३८: सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध लागला.
१९३९: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकार च्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू केले.
१९४३: दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार.
२००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
२०१५: २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

मृत्यू :
• १७०७: औरंगजेबाच्या म्रुत्युमुळे हिंदुस्थानातील सुलतानशाहीतील एक रक्तरंजित व संघर्षमय पर्व संपुष्टात आले. एखादा बादशहा स्वतःची राजधानी सोडुन शत्रुमुलखात २५ वर्षे तळ ठोकून, सतत युद्धसंन्मुख राहतो, असे उदाहरण इतिहासात विरळाच…कदाचित नसेलच. औरंग्या मुक्तीदिन अर्थात औरंगजेबाचा म्रुत्यु
• १९१९: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचे निधन. (जन्म: ८ मार्च , १८६४)
• १९६५: पार्श्वगायिका आणि अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकी यांचे निधन.
• १९४८: भारतीय राजकारणी आणि हिंदू महासभेचे संस्थापक धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवारम मुंजे यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर, १८७२)
• १९८२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ फिरक गोरखपुरी यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट, १८९६)
• १९९५: तबलावादक पं. निखील घोष यांचे निधन.

जन्म :
१९२०: किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.
१९२३: इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म. (मृत्यू: ८ डिसेंबर, २००१ )
१९२८: कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म. ( मृत्यू : १६ जानेवारी, २०१७)
१९३९: भारतीय कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै , १९९९)
१९५५: विनोदी अभिनेता जसपाल भट्टी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर, २०१२)
१९६७: गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »