‘किसन वीर’च्या कार्यकारी संचालकपदी जितेंद्र रणवरे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी खासगी व सहकारी साखर उद्योग क्षेत्रातील २७ वर्षांचा अनुभव असलेले व सहकारातील विविध पुरस्काराने सन्मानित झालेले जितेंद्र रणवरे यांची निवड झाली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. ते इंदापूर तालुक्यातील निमसाखरचे आहेत.

रणवरे यांचा सत्कार कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व माजी उपाध्यक्ष बाबासाहेब कदम यांनी केला. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, संचालक शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास इथापे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री. रणवरे यांनी आपल्या कामाची सुरूवात अकलुज येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यातून क्लार्क या पदावरून केलेली होती. पुढे एक्साईज ऑफिसर, लिगल अॅण्ड मार्केटींग ऑफिसर तर २०११ मध्ये त्यांनी सोलापूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सेक्रेटरीपदी काम केले.

नंतर त्यांची विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे गंगामाई युनिटच्या असिस्टंट जनरल मॅनेजर पदी नियुक्ती झाली. २०१५ मध्ये साखर आयुक्तांच्या मार्फत घेण्यात आलेल्या कार्यकारी संचालक पदाच्या परिक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले. जुलै २०१६ मध्ये लातुर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर ते कार्यकारी संचालक म्हणून रूजू झाले. या कारकीर्दीत त्यांनी उल्लेखनीय काम केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »