कल्लाप्पाण्णा आवाडे (वाढदिवस विशेष)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

साखर उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणारे उत्तुंग आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे सहकारमहर्षी लोकनेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा ५ जुलै रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! ते वयाची ९२ वर्षे पूर्ण करून ९३ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.

इचलकरंजी नगर परिषदेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. नंतर ते यशाच्या हिंदोळ्यावर स्वार झाले आणि नवीन भराऱ्या घेऊन लागले. ते नगराध्यक्ष झाले. १९६३ मध्ये त्यांनी इचलकरंजी जनता सहकारी बँकेची स्थापना केली. १९८० साली विधानसभा इचलकरंजी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले.

वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात उद्योग व नगरविकास राज्यमंत्री म्हणून यशस्वी कामगिरी केली. मंत्रिपदाच्या कारकीर्दीत इचलकरंजीच्या यंत्रमाग व्यवसायाच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेऊन वस्त्रोद्योग व्यवसाय वाढीस नेला.

१९८१ मध्ये दत्ताजीराव कदम टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणजेच डीकेटीई या संस्थेची स्थापना केली. इचलकरंजी को-ऑप. स्पिनिंग मिल म्हणजेच आयको, नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी, तसेच देशातील पहिली इंदिरा महिला सहकारी सूतगिरणी उभारून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.

१९९२ साली हुपरी येथे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या मतांनी विजयी होत त्यांनी संसदेत प्रवेश केला. त्यांची कारकीर्द अत्यंत झळाळती आणि काम अनुकरणीय आहे.
ते शतायुषी तर होतीलच. त्यांना दीडशतकाचा आशीर्वाद लाभो, अशीच प्रार्थना

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »