कल्लाप्पाण्णांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबिर
कोल्हापूर : हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सहकारमहर्षी कलाप्पाण्णा आवाडे यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त कारखान्याच्या कार्यस्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व कार्यक्रम केन कमिटीचे चेअरमन डॉ. राहुल आवाडे, व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, कामगार कल्याण मंडळ गट कार्यालयाचे अधिकारी विजय शिंगाडे व सचिन खराडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी दादांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर ६०० झाडांचे रोपण करण्यात आले. तसेच तुलशी ब्लड बँक जयसिंगपूर व लायन्स ब्लड बँक इचलकरंजी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये १०० दात्यांनी रक्तदान केले.
डॉ. राहुल आवाडे म्हणाले, दादांनी कायमच सर्वसामान्य जनतेच्या भल्याचा विचार केल्यामुळे अनेक सहकारी व शैक्षणिक संस्थांची उभारणी केली. इचलकरंजीत बेंदूर कमिटीपासून सुरुवात करून खासदारकीपर्यंत दादांनी अनेक पदे भूषवली व त्यातून समाजाच्या विकासाची कामे केल्याचा उल्लेख केला.
कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी ‘सहकारमहर्षी आवाडे यांनी अगदी जुन्या काळात भविष्याची गरज ओळखून शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून दिले. या भागातील जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. कामगारांच्या मुलांनी पुढील इंजिनिअरिंग व मेडिकलसाठी महाराष्ट्र मंडळाकडून राबवण्यात योजनेचा लाभ घ्यावा.’
कार्यकारी संचालक मनोहर जोशी म्हणाले, ‘ सहकारमहर्षी आवाडे म्हणजे एक वटवृक्षच आहेत. जवाहर परिवाराकरिता त्यांनी चार दशके अविरत कष्ट केले आहेत. त्यामुळे शेतकरी व कामगारांना एका चांगल्या संस्थेचा भाग होता आले. कामगारांच्या मुलांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे व आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे. प्रास्ताविक जवाहर साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर यांनी केले. आभार सदस्य सुरेश पोवार यांनी मानले. सूत्रसंचालन अण्णासाहेब गिरीबुवा यांनी केले.