महाराष्ट्र ऊस ऊत्पादक संघाच्या संचालकपदी साहेबराव खामकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे  – महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या राज्य संचालक पदी नवदीप सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व साखर उद्योगाचे अभ्यासक साहेबराव खामकर यांची नुकतीच निवड करण्यात आली.

संघा मार्फत ऊस उत्पादकता वाढीच्या दृष्टीने शेतक-यांना नियमित मार्गदर्शन केले जाते. खामकर यांचा साखर कारखान्यातील अनुभव व  अभ्यास लक्षात घेऊन त्यांची राज्य संचालक पदी निवड केल्याचे संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुल माने पाटील यांनी सांगितले.

संघा मार्फत एकरी १०० टन ऊस ऊत्पादन अभियान, महाराष्ट्र ऊस भूषण कार्यगौरव पुरस्कार, जमीनआरोग्य व्यवस्थापन, मशागत ,बेणे लागवड , बेणे प्रक्रिया, आंतरपीक व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन, ऊस तोडणी व्यवस्थापन अशा विविध विषयांवर राज्यातील वेगवेगळ्या भागात उपक्रम राबविण्यात येतात.

ऊस हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नगदी पीक असून या पिकामुळे राज्याची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती होण्यास मदत झाली आहे. शेतक-यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ऊस पिकाची ऊत्पादकता वाढविणे आवश्यक असल्याने संघ प्रयत्नशील आहे व या करिता खामकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार असल्याचे माने  म्हणाले.

आपल्या अनुभवाचा जास्तीत जास्त फायदा शेतक-यांना होण्याच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्नशील राहाणार असल्याचे खामकर यांनी सांगितले. या पदावर निवड झाल्याबद्दल खामकर यांचे भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक धनजीभाई शेळके, पुणे वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. संतोष खामकर ,माजी कार्यकारी संचालक तात्यासाहेब निकम तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »