कोल्हे कारखान्यात कामगारांना सुरक्षेची शपथ

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नगर : कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना स्थळावर ५३ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.

या या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष मनेष गाडे होते. ते म्हणाले, या कारखान्यात कामगारांसह परिसर सुरक्षेची काळजी घेतली जाते. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. त्याबद्दल सर्व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. त्यांनी यापुढेही कारखान्यांच्या सुरक्षा मानकाकडे अधिक लक्ष द्यावे.

कार्यकारी संचालक बाजीराव सुतार म्हणाले, कारखान्यात रासायनिक प्रकल्प असल्यामुळे सर्वांच्या सुरक्षेला आपल्या कारखान्याचे संस्थापक स्व. कोल्हे यांनी प्राधान्य दिले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैया कोल्हे यांनी काम करणाऱ्या प्रत्येक घटकाच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सुरक्षेची आधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.

यावेळी कामगारांना सुरक्षेची शपथ देण्यात आली. प्रशासकीय अधिकारी प्रकाश डुंबरे यांनी प्रस्ताविकात अपघात टाळण्यासाठी उपाययोजना, रासायनिक पदार्थ हाताळताना घ्यावयाची काळजी, सुरक्षिततेचे नियम आदींवर मार्गदर्शन केले. सुरक्षा अधिकारी सलमान शेख यांनी प्रदर्शनातील आधुनिक सुरक्षा उपकरणांची माहिती दिली.

Kolhe Sugar safety week

गेल्या वर्षभरात कारखान्यात अपघात टाळण्यासाठी मदत करणाऱ्या कामगारांचा संचालक बाळासाहेब वक्ते, आप्पासाहेब दवंगे, निवृत्ती बनकर, ज्ञानेश्वर परजणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व भेट वस्तु देउन सत्कार करण्यात आला.

पी. एस. अरगडे यांनी आभार मानले. यावेळी कामगार नेते मनोहर शिंदे, मानव संसाधन अधिकारी प्रदीप गुरव, सहजानंदनगर शाखेचे उपाध्यक्ष गणपत दवंगे, वेणुनाथ बोळीज व कामगार उपस्थित होते. सुत्रसंचलन सुरक्षा अधिकारी शेख यांनी केले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »