‘क्रांतीअग्रणी’ची निवडणूक बिनविरोध

सांगली : कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार हे ९ जून रोजी स्पष्ट झाले. आता केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे.
अर्ज भरण्याची तारीख दि. ५ ते दि. ९ जूनअखेर होती. शुक्रवारी शेवटच्या दिवशी सर्व २१ जागांवर, तेवढेच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध ठरली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या सर्व होईल. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर २६ जून रोजी याबाबतची औपचारिक घोषणा होईल.






