‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड’ने कृष्णा कारखान्याचा सन्मान

कराड – सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेत रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव माहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला कॉसमॉस बँक पुरस्कृत ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड २०२५’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
पुणे येथे आयोजित सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जागतिक सहकार वर्षाचे औचित्य साधून ग्रीन वर्ल्ड आणि कॉसमॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सहकार मंथन’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृष्णा कारखान्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक निवासराव थोरात, कार्यकारी संचालक बाजीराव निकम, शिवाजी पाटील, विलास भंडारे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, वैभव जाखले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक डॉ. विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद कोकरे, गौतम कोतवाल तसेच साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.






