9.5 लाख टन जादा साखर उत्पादन होणार – ISMA चा सुधारित अंदाज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली – इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने साखर उत्पादनाचा आपला नवा अंदाज जाहीर केला आहे. संस्थेच्या मते २०२३-२४ वर्षांमध्ये देशात साखर उत्पादन साडेनऊ लाख टनांनी वाढून ३४० लाख टन होईल.


या संस्थेने जानेवारी २०२४ मध्ये पहिला अंदाज वर्तवताना साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली होती आणि ३३०.५ लाख टन उत्पादन होईल, असे म्हटले होते. हा अंदाज इथेनॉलकडे वळवण्यात येणाऱ्या संभाव्य साखरेसह होता.
मागील साखर हंगामात 366.2 लाख टन उत्पादन झाले होते.

एका निवेदनात ISMA ने म्हटले आहे, की 2023-24 मध्ये एकूण साखर उत्पादन 340 लाख टन असल्याचा नवा अंदाज आहे, ISMA च्या कार्यकारी समितीने 12 मार्च रोजी झालेल्या बैठकीत साखर उतारा, उसाचे उत्पादन, उर्वरित तोडणी योग्य क्षेत्र/ऊस आणि विविध राज्यांतील कारखाने बंद होण्याच्या अपेक्षित तारखा लक्षात घेऊन नवा अंदाज बांधला आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकात उसाची उपलब्धता अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. तथापि, उत्तर प्रदेश या दुसऱ्या मोठ्या राज्यात उसाची उपलब्धता पूर्वीच्या अंदाजापेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे.

“त्यानुसार, ISMA ने 2023-24 साठी (इथेनॉलकडे वळवण्याआधी) 340 लाख टन असा अखिल भारतीय साखर उत्पादन अंदाज सुधारित केला आहे, जे जानेवारी 2024 मध्ये जाहीर झालेल्या 330.5 लाख टनांच्या अंदाजाच्या तुलनेत खूप अधिक आहे,” निवेदनात म्हटले आहे.

2022-23 मार्केटिंग वर्षात इथेनॉल-निर्मितीसाठी वळवण्यात आलेली 38 लाख टन साखर वगळता, निव्वळ साखरेचे उत्पादन 328.2 लाख टन भरले होते.

चालू 2023-24 वर्षासाठी, सरकारने आतापर्यंत इथेनॉल निर्मितीसाठी केवळ 17 लाख टन साखर वळवण्याची परवानगी दिली आहे. याचा अर्थ साखरेचे निव्वळ उत्पादन ३२३ लाख टन इतके होईल.
ISMA ने म्हटले आहे की 2023-24 विपणन वर्षाच्या 29 फेब्रुवारीपर्यंत निव्वळ साखर उत्पादन (इथेनॉलसाठी वळवल्यानंतर) 255.5 लाख टन होते.

देशात 466 साखर कारखाने अद्यापही सुरू आहेत, याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »