महाराणा प्रतापसिंह
आज गुरुवार, मे ९, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक १९ , शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:०६ सूर्यास्त : १९:०४
चंद्रोदय : ०६:४६ चंद्रास्त : २०:३३
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायन
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : प्रतिपदा – ०६:२१ पर्यंत
क्षय तिथि : द्वितीया – ०४:१७, मे १० पर्यंत
नक्षत्र : कृत्तिका – ११:५५ पर्यंत
योग : शोभन – १४:४२ पर्यंत
करण : बव – ०६:२१ पर्यंत
द्वितीय करण : बालव – १७:१५ पर्यंत
क्षय करण : कौलव – ०४:१७, मे १० पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : वृषभ
राहुकाल : १४:१२ ते १५:४९
गुलिक काल : ०९:२१ ते १०:५८
यमगण्ड : ०६:०६ ते ०७:४३
अभिजितमुहूर्त : १२:०९ ते १३:०१
दुर्मुहूर्त : १०:२५ ते ११:१७
दुर्मुहूर्त : ५:३६ ते १६:२८
अमृत काल : ०९:४१ ते ११:११
वर्ज्य : ०३:१०, मे १० ते ०४:४१, मे १०
गूंज उठी है हल्दीघाटी घोडोंकी इन टापोंसे I
भिल्लोंकी यह सेना लेकर राणा लडता मुगलोंसे I
हाथी पे सलीम है, चेतक पे राणा है, हाथोमे भाला है,
देखो चेतक हाथी के मस्तक पर चढ गया,
टप टप टप टप, टप टप टप टप, टप टप टप टप, झूम ….. II
हळदीघाट येथे ३० मे १५७६ रोजी मेवाडचे महाराज महाराणा प्रतापसिंह आणि अकबराचा मुलगा सलीम ह्यांच्यात घनघोर लढाई झाली.
त्या लढाईची प्रखरता दर्शविणाऱ्या चित्रात दाखवल्याप्रमाणे खरोखरच महाराणा प्रताप सलीमला मारण्यासाठी त्याच्या हत्तीवर आपल्या चेतक घोड्यासह चालून गेले होते. चेतकने आपल्या धन्याचे ‘मन’ ओळखून तशी हत्तीच्या गंडस्थलापर्यंत उंच उडी घेऊन महाराणांना साथ दिली. सलीम वर रोखलेल्या महाराणांच्या भाल्याने अखेरीस हत्तीच्या माहुताच्या छातीचा वेध घेतला आणि ते पाहून सलीम हत्तीवरून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाला.
महाभारतासारख्या तुंबळ झालेल्या ह्या युद्धात दोन्ही बाजूंकडील असंख्य वीर मारले गेले. असंख्य राजपूतांच्या बलिदानाने हे युद्ध अखेरीस अनिर्णीत अवस्थेत थांबवावे लागले.
१५४०: मेवाड चे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी , १५९७)
१९८३ : आज स्व. बाबाराव भिडे यांचा पुण्यस्मरण दिन आहे. बाबाराव हे महाराष्ट्र प्रांताचे प्रांत संघचालक होते. त्यांचे पूर्ण नाव बळवंत नारायण भिडे. यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1904 रोजी सातारा जिल्ह्यातील सबनीसवड या गावी झाला.
ते पुण्याच्या स प महाविद्यालयातून BA आणि लॉ कॉलेजमधून 1929 साली LLB झाले. त्यांनी पुण्यात वकिली सुरु केली व अल्पावधीतच फौजदारी खटल्यांमधील एक नामांकित वकील म्हणून नाव कमावले. ते केवळ अर्थार्जनाकरिता व्यवसाय करणारे वकील नव्हते तर त्याला सामाजिक कार्याची जोड देणारे ऍडव्होकेट होते.
1938 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक प पू डॉ हेडगेवार पुण्यात आले असता त्यांची गाठ बाबारावांशी पडली आणि ते संघाशी कायमचे जोडले गेले. 1967 साली ते महाराष्ट्र प्रांत संघचालक म्हणून नियुक्त केले गेले.
त्यांनी आपली जमीन अनेक सामाजिक संस्थांना नाममात्र किंमतीत दिली होती. सुरुवातीला वकिली आणि नंतर सामाजिक कार्य यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांना आणीबाणीच्या कालखंडात तुरुंगवास भोगावा लागला.
श्री बाबाराव संसारी प्रचारक असे संघ जीवन जगले. प्रत्येक शनिवार-रविवार, तसेच दिवाळी, न्यायालयीन कामकाज सुट्टीचे दिवस या काळात बाबाराव सतत प्रवास करीत होते.
१९८३ साली तळजाई येथे भरलेले ३५,००० तरुणाचे तीन दिवसांचे शिबीर ही जनमानसात बाबारावांची ओळख झाली.
.
9 मे 1983 रोजी नाशिक येथे त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या स्मरणार्थ पुणे महानगरपालिकेने डेक्कन परिसरात संभाजी पुलाशेजारी एक छोटा पूल बांधला व त्याला बाबाराव भिडे पूल असे नाव दिले. त्याचे उदघाटन तत्कालीन विधान परिषदेचे सभापती यांच्या हस्ते केले गेले होते.
. ( जन्म : १३ नोव्हेंबर, १९०४ )
शास्त्रीय गायक पं. फिरोझ बेहरामजी दस्तूर ( मूळ नाव फर्दुनजी ) – देखणे रूप व मधुर आवाज लाभलेल्या फर्दुनजी यांना त्या वेळचे चित्रपटनिर्माते जे.बी. वाडिया यांनी १९३२ साली आपल्या चित्रपटांतून भूमिका करण्यासाठी पाचारण केले व मूळचे फर्दुनजी असलेले आता ‘फिरोझ’ या चित्रपटसृष्टीतील नावाने ओळखले जाऊ लागले. त्या वेळी त्यांचे वय तेरा वर्षांचे होते.
त्या काळी पार्श्वगायनाचे तंत्र विकसित झालेले नसल्याकारणाने व फिरोझ दस्तूर यांचा आवाज अत्यंत मधुर असल्यामुळे वाडिया यांच्या अनेक ऐतिहासिक व पौराणिक चित्रपटांतून उदा. लाले-यमन (१९३३), गुल-ए-बकावली (१९४८), वामन अवतार इ. चित्रपटांतून त्यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. या विविध चित्रपटांतून त्यांनी गायलेल्या गीतांपैकी काही गीते त्या वेळी फारच लोकप्रिय ठरली होती.
एकूण चित्रपटसृष्टीने त्यांना बालवयातच खूप लोकप्रियता मिळवून दिली.
चित्रपटसृष्टीत नाव कमविल्यानंतरही त्यांच्यातला गायक त्यांना स्वस्थ बसू देईना. परिणामी, आपल्या व वडिलांच्याही स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने त्यांनी रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्वांसारख्या किराणा घराण्याच्या एका महान व अत्यंत लोकप्रिय गायकाकडून शास्त्रीय संगीताची तालीम घेण्यास सुरुवात केली.
रामभाऊंनी त्यांना सुमारे पाच वर्षे पक्की तालीम दिली व फिरोझजीही स्वतंत्र कार्यक्रम करू लागले.
मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात त्यांनी सलग ३६ वर्षे किराणा घराण्याचे प्राध्यापक गुरू म्हणून काम केले होते. त्याशिवाय त्यांच्या निवासस्थानीही विद्यार्थी-विद्यार्थिनींना ते शास्त्रीय संगीत शिकवीत असत.
त्यांनी विविध रागांत रचलेल्या सुमारे पन्नास चिजा, तसेच दुर्गामल्हार व चंद्रमुखी या दोन स्वतंत्र रागांची निर्मिती त्यांच्या सर्जनशीलतेची साक्ष देणार्या आहेत.
भारतात, तसेच परदेशांतही त्यांचे कार्यक्रम झाले. कराची येथे १९३९ साली त्यांची प्रथम मैफल झाली. ते १९३३ ते १९९५ पर्यंत आकाशवाणीवर नियमितपणे गायन करत. अच्युत अभ्यंकर, सुधा दिवेकर, श्रीकांत देशपांडे, मिलिंद चित्ताल, गिरीश संझगिरी, चंद्रशेखर वझे इ. शिष्यवर्गही त्यांनी तयार केला.
पं. फिरोज दस्तूर यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताबद्दलचा १९८७ चा ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार, मध्य प्रदेश सरकार पुरस्कृत ‘तानसेन सन्मान’ पुरस्कार, दक्षिण गुजरात विद्यापीठ, सुरत यांच्यातर्फे सन्माननीय ‘डॉक्टरेट’ सन्मान हे दोन्ही १९८८ साली, तसेच ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार असे सन्माननीय पुरस्कार प्राप्त झाले.
अविवाहित असलेल्या पं. फिरोझ दस्तूर यांचे मुंबईत निधन झाले. त्यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांनी त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.
२००८: किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. फिरोझ दस्तूर यांचे निधन. (जन्म ३० सप्टेंबर, १९१९)
- घटना :
१८७४: मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणार्या ट्राम सुरू झाल्या.
१८७७: पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.
१९०४: वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी / ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.
१९३६: इटलीने इथिओपिया देश बळकावला.
१९५५: पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे प्रवेश.
१९९९: ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझ याने ग्रॅन्ड प्रिक्स स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत १ तास १७ मिनिटे व ४६ सेकंदात पूर्ण करुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
• मृत्यू :
१९१७: डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणझोडदास यांचे निधन.
१९१९: रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर, १८६१)
१९५९: थोर शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर, १८८७
१९८६: एवरेस्ट शिखर सर करणारा शेरपा तेलसिंग नोर्गे यांचे निधन. (जन्म: २९ मे,१९१४)
१९९५: दिग्दर्शक अनंत माने यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर, १९१५)
१९९८: पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा तलत महमूद यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी, १९२४)
१९९९: उद्योगपती पद्मभूषण करमसीभाई जेठाभाई सोमय्या यांचे निधन. (जन्म: १६ मे, १९०२ )
२०१४: भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी, १९३५)
- जन्म :
१८१४: अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर, १८८२)
१८६६: थोर समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांचा कातळूक, रत्नागिरी येथे जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी, १९१५)
१९२८: समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक वसंत नीलकंठ गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर , २०१०)